Join us  

सुशांतसाठी रिया चक्रवर्ती नेहमी घ्यायची महेश भट यांचा सल्ला, या कर्मचाऱ्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:58 PM

रिया चक्रवर्ती सुशांतसाठी नेहमी महेश भट यांचा सल्ला घेत होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने केला खुलासा

बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांच्या सिनेमांसाठी काम करणारी सुहृता दासची फेसबुक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्यात तिने सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एक मेसेज लिहिला आहे. त्यात तिने लिहिले की, रिया सुशांतबद्दल महेश भट यांच्याकडून सल्ला घेत होती. सुहृता दास भट भावांच्या मालकीची फिल्म प्रोडक्शन कंपनी विशेष फिल्म्ससाठी काम करते.सुहृता दासचे फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, प्रिय रिया, जग सुशांत सिंग राजपूत याच्या निधनावर दु:ख व्यक्त करीत आहे आणि मी तू दृढ आणि मजबूत होऊन या धक्क्यातून सावरण्याची प्रार्थना करते. मी तुझे सुशांतला सोबत ठेवण्याचे आणि ठीक करण्याच्या अशक्य प्रयत्नांची मूक प्रेक्षक आहे. एक आई आणि नागरिक म्हणून माझे नैतिक कर्तव्य आहे की पुन्हा एकदा आठवण करून देते की वैद्यकीय नैराश्य विनाशकारी आहे आणि वैद्यकीय विज्ञानात यावर कोणताही उपाय किंवा उत्तर नाही.

तिने पुढे म्हटले की, प्रत्येक वेळी जेव्हा तू भट साहेबांचा सल्ला घेण्यासाठी ऑफिसमध्ये येत होती किंवा त्यांच्याशी फोनवर बोलायची, तेव्हा मी तुमचा प्रवास आणि संघर्ष पहिला आहे. सुशांतच्या गच्चीवरची संध्याकाळ विसरणे फारच कठीण झाले जेव्हा वाटले होते की बरा होत आहे, मात्र तो दूर जात होता. महेश सरांनी हे पाहिले होते आणि म्हणूनच आपले मास्टर युजीचा इशारा देत सांगितले दूर जा, नाही तर तो तुला सोबत घेऊन जाईल. आपण आपले सर्वकाही दिले आणि आपण आपल्यापेक्षा बरेच काही केले. लव्ह यू माय जलेबी, खंबीर रहा.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याने कोणतीही सुसाइड नोट ठेवली नव्हती. त्यामुळे अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमहेश भटरिया चक्रवर्ती