Join us  

मैं नहीं मानता, मैं नहीं मानता...! महेश भट यांचे मोदींविरोधात ट्वीट; पुन्हा झालेत ट्रोल!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 10:06 AM

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर महेश भट  पुन्हा एकदा मोदींविरोधात मैदानात उतरले.

ठळक मुद्देमहेश भट यांच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ते ‘सडक 2’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्षांनंतर वापसी करताहेत

आपले राजकीय विचार बेधडकपणे मांडणारे दिग्दर्शक म्हणजे महेश भट्ट. पीएम मोदी संघाच्या विचारधारेसोबत आहेत, तोपर्यंत त्यांना असलेला आपला विरोध कायम असेल, अशी भूमिका अलीकडे एका मुलाखतीत महेश भट यांनी बोलून दाखवली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर महेश भट  पुन्हा एकदा मोदींविरोधात मैदानात उतरले. महिला पत्रकार राणा अयुब यांचा एक लेख शेअर करत, महेश भट यांनी आपली भूमिका उजागर केली. राणा यांनी टाईम पत्रिकेसाठी हा लेख लिहिला होता. ‘ती निवडणूक, ज्यामुळे कोट्यवधी लोक दहशतीत आहेत,’ अशा आशयाचे शीर्षक असलेल्या या लेखात राणा यांनी एनआरसी पॉलिसी, गो संरक्षणाच्या नावावर होत असलेल्या हत्या, धु्रवीकरणाचे प्रयत्न अशा अनेक गोष्टींमुळे देशातील एक मोठा समुदाय स्वत:ला असुरक्षित समजू लागला आहे, असे विचार मांडले आहेत.महेश भट यांनी हा लेख एका गर्भित कॅप्शनसह शेअर केला. ‘ऐसे दस्तूर को, सुबहे बेनूर को, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता...’, असे त्यांनी लिहिले. मोदींनी धोकादायक हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांना चालना दिली आहे. त्यांच्या दुस-या कार्यकाळात हे विचार आणखी प्रखर होतील, असे त्यांनी लिहिले.

महेश भट यांनी ही पोस्ट शेअर केली आणि लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरू केले.

महेश भट यांच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या ते ‘सडक 2’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्षांनंतर वापसी करताहेत. या चित्रपटात पूजा भट, आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य राय कपूर असे कलाकार आहेत.

टॅग्स :महेश भटलोकसभा निवडणूक निकाल