Join us  

जावयाचं भरभरून कौतुक करतायत महेश भट्ट, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 7:20 PM

महेश भट्ट यांनी आपल्या जावयाचं भरभरुन कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सगळीकडे त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहेत. आता यातच रणबीर कपूरचे सासरे अर्थात महेश भट्ट यांनी आपल्या जावयाचं भरभरुन कौतुक केले आहे. पण, याचे कारण सिनेमा नाही तर 'राहा' आहे. महेश भट्ट यांनी रणबीर कपूरला 'बेस्ट फादर' म्हटले. 

नुकतेच रणबीर कपूर 'इंडियन आयडॉल सीझन 14' मध्ये आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. रणबीरसोबत रश्मिका मंदान्नाही होती. यावेळी रणबीरसाठी सासरे महेश भट्ट यांनी एक हृदयस्पर्शी संदेश पाठवला होता.

आलिया भट्टचे वडील म्हणाले, 'आलियाच्या मते रणबीर या देशातील सर्वोत्तम अभिनेता आहे, पण मी रणबीरला जगातील सर्वोत्तम पिता मानतो. मुलगी राहावर रणबीर अगदी एका आईप्रमाणे प्रेम करतो. जेव्हा रणबीर राहाकडे पाहतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील भाव तुम्ही पाहायला हवेत. मला अभिमान आहे की रणबीर माझा जावाई आहे'. महेश भट्ट यांच्या तोंडून कौतुकाचे बोल ऐकताच रणबीरही भावूक झाल्याचे दिसून आले. 

‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अ‍ॅनिमल'चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.  रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने ॲडव्हान्स बुकिंगद्वारे 2 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :महेश भटबॉलिवूडसेलिब्रिटीरणधीर कपूरआलिया भट