Join us  

महेश भट ह्या कारणासाठी जाणार उत्तराखंडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 6:10 PM

१९९१ साली 'सडक' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे 'सडक'चा येणार सीक्वल'सडक २'मध्ये आलिया भट व आदित्य रॉय कपूर दिसणार मुख्य भूमिकेत

दिग्दर्शक महेश भट तब्बल वीस वर्षानंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. ते 'सडक'च्या सीक्वलसाठी लोकेशन ठरवण्यासाठी १ व २ नोव्हेंबरला मुलगी पूजा भट व भाऊ मुकेश भटसोबत उत्तराखंडमधील माणा व औली येथे जाणार आहेत. अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच वडील महेश भट व बहिण पूजा भटसोबत काम करताना दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे सहा दिवस उत्तराखंडमध्ये राहणार आहेत.

१९९१ साली 'सडक' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश भट यांनी आपल्या ७०व्या वाढदिवसादिवशी सडक २ सिनेमाची घोषणा केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी बॉर्डरच्या आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण केले जाणार आहे. महेश भट, पूजा भट व मुकेश भट लोकेशन पाहण्यासाठी १ व २ नोव्हेंबरला देहारदूनला पोहचणार आहेत. तिथून हॅलिकॉप्टरने माणा व औलीला जाणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, 'सडक २' चित्रपट २५ मार्च २०२०ला प्रदर्शित होणार आहे. १९९१ मध्ये शेवटचे पूजा भट व संजय दत्त सडक चित्रपटात शेवटचे दिसले होते. त्यानंतर त्यांनी कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही. आता ते दोघे तब्बल २७ वर्षांनंतर सडक २ सिनेमामध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.१९९१ मध्ये 'सडक' हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत 'सडक२'मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :महेश भटपूजा भटआलिया भट