Join us

महेश बाबूच्या बॉलिवूड एंट्रीवरून पत्नीने केला ‘हा’ खुलासा, चाहत्यांची होऊ शकते निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 18:50 IST

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, साउथ सुपरस्टार महेश बाबू लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करू शकतात. विशेष म्हणजे त्यांनी बॉलिवूड ...

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, साउथ सुपरस्टार महेश बाबू लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करू शकतात. विशेष म्हणजे त्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत याविषयी मीटिंगही केली होती. परंतु आता या प्रकरणावरून त्यांची पत्नी नम्रता शिरोडकरने एक खुलासा केला आहे. हा खुलासा जाणून त्यांच्या हिंदी चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. होय, नम्रताने खुलासा करताना म्हटले की, सध्या तरी त्यांची बॉलिवूडमध्ये येण्याची कुठलीही इच्छा नाही. नम्रताने डेक्कन क्रॉनिकलशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. नम्रताने महेश बाबूच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या फेटाळून लावताना म्हटले की, ‘या बातम्या पूर्णत: खोट्या आणि तर्कहीन आहेत. महेश बाबू बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळविण्याच्या सध्या तरी विचारात नाहीत. तसेच ते कोण्याही बॉलिवूड निर्मात्याला भेटण्यासाठी थांबले नव्हते. तर ते त्यांचा हेअरस्टायलिस्ट हाकिम आलिमसोबत एका तेलगू चित्रपटासाठी लूक टेस्ट देण्यासाठी थांबले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, ‘श्रीमंथुडू’ या तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामध्ये सलमान खान किंवा हृतिक रोशन या दोघांपैकी एकाला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले जाणार आहे. अनुपमा चौधरीशी बोलताना महेश बाबूने म्हटले होते की, ‘जर मला चांगली आॅफर मिळाली तर मी हिंदी चित्रपटांमध्येही काम करू शकतो. महेश बाबू अखेरीस ‘भारत ऐने नेनू’ या तेलगू चित्रपटात बघावयास मिळाले होते. ज्यामध्ये कियारा आडवाणी आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते. आतापर्यंत महेश बाबूच्या बºयाचशा चित्रपटांचे हिंदी रिमेक बनविण्यात आले आहेत.