Join us  

महेश बाबूने मानले त्या खऱ्या हिरोंचे आभार, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 6:31 PM

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे चित्रपट एकानंतर एक सुपरहिट ठरले आहेत. त्याचे फक्त देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. इतकंच नाही तर कित्येक लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महेश बाबूने कोरोनाशी लढण्यासाठी 1 कोटींचा मदतनिधी दिला आहे. महेश बाबूने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, "ही पोस्ट रस्त्यांवर तैनात सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आहे जे आपल्या आसपासच्या वातावरणाला साफ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षित बसलो आहोत, तेव्हा ते दररोज आपल्या घरातून बाहेर पडत आहेत कारण आपण सर्वजण सुरक्षित राहावे. या खतरनाक व्हायरससोबत ही निरंतर सुरु असलेली लढाई या फ्रंट-लाइन कर्मचाऱ्यांसाठी एक आव्हान आहे आणि तुम्ही आमच्यासाठी हे काम करत आहात... तुम्हा सगळ्यांनाचे आभार, सम्मान आणि नि:सीम प्रेम आणि आशीर्वाद'' अशा शब्दांत महेश बाबूने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'सरिलरु नीकेवरु' ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट 100 करोड़चा आकड़ा गाठणारा महेश बाबूचा लागोपाठ तीसरा सिनेमा ठरला आहे. यामध्ये प्रथमच महेश बाबू एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

टॅग्स :महेश बाबू