महेशबाबूला नको अक्षय कुमार, शाहरूख खानशी पंगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 15:50 IST
साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा आगामी चित्रपट ‘स्पाईडर’ येत्या ११ आॅगस्टला रिलीज होणार असल्याची खबर मध्यंतरी आली होती. याच दिवशी ...
महेशबाबूला नको अक्षय कुमार, शाहरूख खानशी पंगा!
साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा आगामी चित्रपट ‘स्पाईडर’ येत्या ११ आॅगस्टला रिलीज होणार असल्याची खबर मध्यंतरी आली होती. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि शाहरूख खानचा नवा चित्रपट (इम्तियाज अली दिग्दर्शित)होणार आहे. त्यामुळे ‘स्पाईडर’चा अक्षय व शाहरूखच्या चित्रपटाशी बॉक्सआॅफिस संघर्ष ठरलेला होता. पण आता हा क्लॅश टळल्याची नवी बातमी आहे. आता महेशबाबूचा चित्रपट दसºयाच्या मुहूर्तावर रिलीज होणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख व अक्षयचा चित्रपटही ११ आॅगस्टलाच रिलीज होण्याचे महेशबाबूला कळले तेव्हा, त्याने आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणेच योग्य समजले. सर्वात आधी महेशबाबूचा चित्रपट व सलमानचा ‘ट्यूबलाईट’ यांची बॉक्सआॅफिस टक्कर होणार होणार होती. मात्र तेव्हाही महेशबाबूने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली.तब्बल ११० कोटी रुपए खर्चून ए. आर. मुरूगदास यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे. तेलगूसोबतच हिंदीतही हा चित्रपट रिलीज होतो आहे. त्यामुळे उत्तर भारतात नाही पण दक्षिण भारतात महेशबाबूलला बॉक्सआॅफिसवर भिडावे लागणार आहे. अशात सलमान, शाहरूखशी पंगा घेणे योग्य नाही, ही बाब महेशबाबूला कळली आहे. तेव्हाच एक नाही तर दोनदा महेशबाबूने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट लांबवलीयं.या चित्रपटात महेशबाबू दमदार स्टंट करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे बॉडी डबलचा वापर न करता महेशबाबूने हे स्टंट केले आहेत. बॉडी डबलही घाबरतील, असे काही स्टंट यात आहेत. पण महेशबाबूने न घाबरता हे स्टंट केलेत. यात त्याच्यासोबत राकुल प्रीत फिमेल लीड साकारताना दिसणार आहे.