Join us  

Madhuri Dixit Dance with Dhanashree Verma: 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितसोबत क्रिकेटर चहलची पत्नी धनश्रीचा 'सुपर डान्स' (Viral Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:34 PM

धनश्री उत्तम डान्सर अन् कोरियोग्राफर आहे.

Dhanashree Verma Madhuri Dixit: भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा ही एक उत्तम डान्सर आहे. तसेच ती एक प्रोफेशनल कोरिओग्राफरही आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही ना काही डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्यासोबतचा तिच्या डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक त्याला खूप पसंत करत आहेत.

माधुरी दिक्षितसोबतचा धनश्री वर्माचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

माधुरी दिक्षितसोबत डान्स करायला मिळणं हे युवा डान्सर्सचं स्वप्न असतं. हा व्हिडिओ पोस्ट करत धनश्री वर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा (डान्स) म्हणजे केवळ सोमवारची प्रेऱणा (Monday Motivation) नसून नाही तर आयुष्यभराची प्रेरणा (Lifetime Motivation) आहे. आमच्या आवडत्या माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याची संधी मिळाली. मजेदार शूटसाठी मजेदार रील तर हवंच!"

धनश्रीच्या या व्हिडिओला आतापर्यंत १.८० लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. हा व्हिडिओ धनश्री वर्माने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्याशिवाय आणखी काही कलाकारही आहेत. 'ब्रदर स्विंग'च्या व्हायरल गाण्यावर ते सगळेच नाचताना दिसत आहेत. माधुरीने नुकतीच OTT वर 'द फेम गेम' नावाची हिंदी वेब सिरीज केली आहे. त्यामुळे तीदेखील काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आहे.

 

टॅग्स :माधुरी दिक्षितयुजवेंद्र चहलनृत्यसोशल मीडिया