Join us  

मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:46 PM

स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजच्या लिस्टमध्ये ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे.

ठळक मुद्दे‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेत सगळ्यात वरच्या स्थानी राहिली

स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. त्यानुसार या यादित ‘मिर्झापूर’ पहिल्या स्थानवर ‘सॅक्रेड गेम्स’ दुस-या स्थानावर आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजच्या लिस्टमध्ये ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात ‘मेड इन हेवन’, ‘दि फायनल कॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘दि शोले गर्ल’ ह्या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेत सगळ्यात वरच्या स्थानी राहिली.

गेल्या काही दिवसांपासून स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्ट्सवर ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापूर’ या दोन क्राइम थ्रिलर्स वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय झालेल्या दिसल्या. मार्चमध्ये अमेझॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली. मार्च 2019मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेच्या शिखरावर कमी अवधीत चढत गेली. 'द फाइनल कॉल', फ्लिप आणि ‘द शोले गर्ल’ ह्या मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजही सध्या लोकप्रिय झालेल्या दिसून येतायत. वेब सीरीजच्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, व्हायरल न्यूज, डिजिटल न्यूज आणि न्यूजपेपर्समध्ये त्यांचा वाढत्या बातम्या ते स्टार्स झाल्याचाच पुरावा आहे. मार्चमध्ये रिलीज झालेली ‘दिल्ली क्राइम’ सुध्दा कमी अवधीत लोकप्रिय झाली. ज्यामुळे आम्हाला असं वाटतंय, की ही वेबसीरिज येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करेल. “

टॅग्स :वेबसीरिजमिर्झापूर वेबसीरिज