Join us

‘मैै हुं ना २’ लवकरच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:11 IST

रिमेकचे वारे बॉलिवूडमध्ये जोरदार वाहत आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. त्यात आणखी एक नाव जोडले ...

रिमेकचे वारे बॉलिवूडमध्ये जोरदार वाहत आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. त्यात आणखी एक नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.2004 साली आलेल्या ‘मै हुं ना’ चित्रपटचा पुढील भाग लवकर येणार असल्याचे सुतावेच खुद्द फराह खान आणि शाहरुखनेच दिले आहेत.‘मैै हुं ना’ला बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुखने ट्विटद्वारे चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. तो लिहितो, ‘मै हुं ना’च्या चित्रीकरणाचे दिवस मी खूप मिस करतो. फराह, झायेद, अमृता, सुश्मिता, बोमन, सुनिल यांसारख्या मित्रांसोबत काम करतान खूप मजा आली. सतीश शहाचा थुंकणारा प्राध्यपक तर अप्रतिम होता. सहकाऱ्यांना तुमच्यामुळे ही फिल्म एवढी छान बनली.शाहरुखच्या ट्विटला उत्तर देताना फराह म्हणाली की, चला आपण पार्ट २ बनवूया. आता दिग्दर्शिकाच सिक्वलची इच्छा व्यक्त करते म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता नक्कीच ताणली गेली असणार.