Join us  

क्रिती सॅनन आणि कार्तिक आर्यनच्या लुपा छुपीने बॉक्स ऑफिसवर कमवला तब्बल इतका गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 9:00 PM

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.

ठळक मुद्देलुका छुपीने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला आहे तर दुसऱ्या दिवशी ९.७५ करोड इतके कलेक्शन या चित्रपटाने केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दोन दिवसांत १७.७५ इतका गल्ला जमवल्यानंतर रविवारी तर हा चित्रपट ३० करोड तरी कलेक्शन करेल असा अंदाज लावला जात आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांचा ‘लुका छुपी’ हा सिनेमा नुकताच १ मार्चला प्रदर्शित झाला असून या दोघांसोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, विनय पाठक, अपारशक्ती खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे ‘मथुरा लाईव्ह’ असे नामकरण आधी करण्यात आले होते. पण पुढे ते बदलून ‘लुका छुपी’ असे ठेवण्यात आले. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित असून हा कॉमेडी फॅमिली ड्रामा रोहन शंकर यांनी लिहिला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. 

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला आहे तर दुसऱ्या दिवशी ९.७५ करोड इतके कलेक्शन या चित्रपटाने केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दोन दिवसांत १७.७५ इतका गल्ला जमवल्यानंतर रविवारी तर हा चित्रपट ३० करोड तरी कलेक्शन करेल असा अंदाज लावला जात आहे.

लुका छुपी या चित्रपटाचे समीक्षकांनी देखील कौतुक केले होते. तसेच ही आकडेवारी पाहाता प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे असेच म्हणावे लागेल. पण याच्या तुलनेत सोनचिडिया या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणे खूपच कठीण जात आहे. सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी या चित्रपटाला पहिल्या दोन दिवसांत केवळ २ कोटींचाच गल्ला जमवता आला आहे. 

लुका छुपी या चित्रपटात कार्तिक आर्यन ग्वाल्हेरमधील एका मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. २५ कोटी खर्चून तयार झालेला हा चित्रपट देशभरातील ३००० स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. ‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. 

टॅग्स :लुका छुपीकार्तिक आर्यनक्रिती सनॉन