‘लकी’ दिग्दर्शकांची ‘क्वीन’शी कट्टी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:10 IST
बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत सध्या भलतीच फॉर्मात आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आज मैं उपर अशीच तिची काहीशी अवस्था झालीय. ...
‘लकी’ दिग्दर्शकांची ‘क्वीन’शी कट्टी ?
बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौत सध्या भलतीच फॉर्मात आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आज मैं उपर अशीच तिची काहीशी अवस्था झालीय. बॉलीवुडमध्ये तिचा भावही चांगलाच वधारलाय. प्रत्येक दिग्दर्शक कंगणासह काम करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र गेल्या काही दिवसांत क्वीन आणि सुपरहिरो हृतिकमध्ये वाद सुरु आहे. आता याच वादाचे साईड इफेक्ट्स कंगणाला जाणूवू लागलेत. कारण क्वीनसाठी लकी असणा-या दिग्दर्शकांनी तिला हिसका दाखवलाय. 'तनु वेड्स मनु' सिरीजचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी कंगणासोबत कामास नकार दिलाय. 'तनु वेड्स मनु' रिटर्न्सच्या यशानंतर 'तनु वेड्स मनु-3' हा सिनेमा बनावा अशी कंगणाची इच्छा होती. मात्र आनंद एल राय यांनी मात्र सध्या याला रेड सिग्नल दाखवलाय. दुसरीकडे 'कट्टीबट्टी' सिनेमाचे दिग्दर्शक निखील अडवाणी यांनीही कंगणासोबतचा पुढचा सिनेमा होल्डवर ठेवलाय. आता हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलाय. तसंच त्याची स्टारकास्टही निखील बदलणार असल्याचं समजतंय.