Join us  

वडील मेहमूदसारखे नाव कमावू शकला नाही हा गायक-अभिनेता, 25 वर्षांने लहान असलेल्या मुलीसोबत केलं तिसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 2:03 PM

सध्या ग्लॅमरपासून दूर असलेला हा अभिनेता काही लाईव्ह कॉन्सर्ट करतोय. आज तो आपला वाढदिवस साजरा करतोय. 

कॉमेडीचा बादशाह मेहमूद याचा मुलगा लकी अली आपल्या वडिलांप्रमाणे नाव कमावू शकला नाही. लकी अलीने अभिनय  आणि संगीतकार म्हणून आपला हात आजमावला मात्र वडिलांप्रमाणे त्याला यश मिळवू शकला नाही.लकी अली सध्या ग्लॅमरपासून दूर शेतीत आपला अधिकाधिक वेळ घालवताना दिसतोय. अर्थात काही लाईव्ह कॉन्सर्टही तो करतोय. लकी अली आज आपला 61वा वाढदिवस साजरा करतो. 

लकी अली 1970 ते 1980 त्या दशकात अनेक सिनेमांमध्ये दिसला होता.  'ये है जिंदगी', 'हमारे तुम्हारे','त्रिकाल' या सिनेमामंघ्ये दिसला होता त्यानंतर त्याने सिनेमांमधून ब्रेक घेतला. 2002 मध्ये आलेल्या ‘कांटे’ सिनेमामधून कमबॅक केला. लकी शेवटचा 'सुर-द मेलोडी ऑफ लाईफ' सिनेमाध्ये दिसला होता.

  हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘एक पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत.

मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली. लकी आणि आयशाला  एक मुलगा आहे ज्याचे नाव डॅनी मकसूद अली आहे