Join us

​कमी बजेट चित्रपटांनी केली बक्कळ कमाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:36 IST

-रवींद्र मोरे बऱ्याचदा चित्रपट सुपरहिट व्हावा म्हणून तो बिग बजेट केला जातो, आणि आपणासही असेच वाटते की, जास्त बजेट ...

-रवींद्र मोरे बऱ्याचदा चित्रपट सुपरहिट व्हावा म्हणून तो बिग बजेट केला जातो, आणि आपणासही असेच वाटते की, जास्त बजेट असणारे चित्रपटच खूप कमाई करु शकतात, मात्र सध्या तरी चित्रपटांच्याबाबतीत हा अनुमान लावणे चुकीचे ठरत आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे खूप कमी बजेटवर तयार झाले आहेत आणि त्यांनी बक्कळ कमाई केलीये. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया जे खूप कमी बजेटने तयार होऊनही बॉक्स आॅफिसवर त्यांनी बक्कळ कमाई केली. * सोनू के टीटू की स्वीटीअलिकडे २३ फेब्रुवारीला रिलीज झालेला लव्ह रंजन दिग्दर्शित 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाने आतापर्यंत १०७ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त ३५ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत बरुचा, सनी सिंह निज्जर, आलोक नाथ, इशिता राज शर्मा, दीपिका अमीन हे आहेत. * टॉयलेट : एक प्रेम कथा स्वच्छ भारत अभियानाशी प्रेरित या चित्रपटाचा बजेट अत्यंत कमी म्हणजेच फक्त १८ कोटीचा होता. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आतापर्यंत सुमारे २१६ कोटीची कमाई केल्याचे समजते. नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, भूमि पेडणेकर, अनुपम खेर, सना खान आदी कलाकार होते. * जॉली एलएलबी 2 कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘जॉली एलएलबी 2’ चाही बजेट खूप कमी होता. फक्त ३० कोटीच्या बजेटने बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे १९२ कोटीची बक्कळ कमाई करत एक रेकॉर्डच केला. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत होते.    * बद्रीनाथ की दुल्हनियावरुण धवन, आलिया भट्ट, गौहर खान आणि मोहित मारवाह स्टारर या चित्रपटाचा बजेट फक्त ४५ कोटी होता, मात्र चित्रपटाची दमदार स्क्रीप्ट आणि वरुण-आलियाच्या केमिस्ट्रीने बॉक्स आॅफिस दणाणून सोडत सुमारे २०६ कोटीची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतन यांनी केले होते. * लिपस्टिक अंडर माय बुरखामहिलांच्या लैंगिक विषयावर आधारित या चित्रपटाचाही बजेट तसा खूपच कमी होता. फक्त ६ कोटी एवढ्या कमी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तब्बल २६.६८ कोटीची कमाई केली. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक, अहाना कुम्रा, सुशांत सिंह, वैभव तत्त्ववादी आदींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.