Join us  

दो दिल मिल रहे है चुपके-चुपके, इशान-जान्हवीमध्ये रंगतेय रिअल लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:41 PM

इशान आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विशेषतः इशान आपल्या लेडी लव्ह जान्हवीला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो.

'धडक' सिनेमातून  इशान परश्या तर जान्हवी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर. असंच काहीसं बॉलीवुडच्या या रिल परश्या आणि आर्चीमध्ये घडत आहे. चोरी चोरी चुपके चुपके धडकच्या सेटवर रिअल लव्हस्टोरी सुरू झाली होती. इशान आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विशेषतः इशान आपल्या लेडी लव्ह जान्हवीला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. जान्हवी सरप्राईजेस देणे हा जणू इशानचा छंदच बनला आहे. सकाळ संध्याकाळ इशान जान्हवीसाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर इशानने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच जान्हवीसाठी खास अमेरिकेहून विशेष गिफ्ट मागवलं होतं. हे गिफ्ट पाहून जान्हवीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यामुळे जान्हवीसुद्धा इशानवर लट्टू झाल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे जान्हवीचं नाव तिचा कथित बॉयफ्रेंड अक्षत राजनशीही जोडलं गेलं. गेल्या वर्षी नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अक्षतसह जान्हवी गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन थिरकत असल्याचे पाहायला मिळालं होतं. याशिवाय एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यांत जान्हवी, अक्षत, बोनी कपूर आणि श्रीदेवी पाहायला मिळाल्या होत्या.

 जान्हवी कपूरला सध्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातायत. दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या सदमै सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे. सदमा सिनेमातील श्रीदेवी यांनी साकारलेली नेहलता आणि कमल हासनचा सोमू रसिकांना भावला होता. त्यामुळेच सदमा सिनेमातील श्रीदेवी यांच्या आव्हानात्मक भूमिका साकारत आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे.

 

टॅग्स :धडक चित्रपटजान्हवी कपूरइशान खट्टर