Join us

भाच्च्यावर मामुजानचे प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 10:12 IST

 अर्पिता खान शर्मा ही सलमान खानची खुप लाडकी बहीण आहे. ती काही महिन्यांपूर्वीच आई झाली असून तिचा मुलगा अहिलवर ...

 अर्पिता खान शर्मा ही सलमान खानची खुप लाडकी बहीण आहे. ती काही महिन्यांपूर्वीच आई झाली असून तिचा मुलगा अहिलवर  मामु सलमान खान याचा प्रचंड जीव आहे. अर्पिताने जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा तो ‘सुल्तान’ ची शूटींग अर्धवट सोडून त्याला पाहण्यासाठी आला होता.अर्पितासोबत अहिल किंवा घरच्या कुणासोबतही अहिलचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. मात्र, नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने अहिलला स्वत:च्या हातावर घेतलेले आहे.अहिलच्या कपाळावर तो किस करताना यात दिसतो आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ माय फेव्हरेट्स देम! ब्लेस्ड विथ द बेस्ट कान्ट थँक गॉड इनफ़ ’ सलमानला अगोदरच लहान मुलं प्रचंड आवडतात. पण अहिलचे त्याच्या मनातील स्थान काही वेगळेच आहे.