Join us

बघाच, कंगनाचा ‘फिट टू फाईट’ व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 17:28 IST

मला कुणी काहीही म्हणो, मला त्याने काहीही फरक पडत नाही, असे अलीकडे एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रानोट हिने ठणकावून सांगितले. कमालीची सकारात्मकता आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तरच हा अ‍ॅटिट्यूड शक्य आहे. तिचा हा व्हिडिओही हेच सांगणारा आहे.

बघाच, कंगनाचा ‘फिट टू फाईट’ व्हिडिओ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर तिनदा नाव कोरणारी अभिनेत्री कंगना रानोट हिच्या आयुष्यात सध्या फार काही आॅलवेल नाही. हृतिक रोशन हिच्यासोबतचा तिचा वाद कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणासंदर्भात रोज नवे खुलासे होत आहेत. यानिमित्ताने कंगनाच्या अतिशय खासगी आयुष्यातील फोटो आणि मेल्स समोर आले आहेत. एवढे कमी की काय, तिचा एक एक्स बॉयफे्रन्डने कंगनावर गंभीर आरोप केले आहेत. कंगना काळी जादू करायची इथपासून तर ती तिचे पीरियड ब्लड मला जेवणातून द्यायची, असे आरोप त्याने कंगनावर केले. पण यासर्वांना कंगना पुरून उरली, असेच म्हणायला हवे. अलीकडे एका मुलाखतीत मला कुणी काहीही म्हणो, मला त्याने काहीही फरक पडत नाही, असे तिने ठणकावून सांगितले. कमालीची सकारात्मकता आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तरच हा अ‍ॅटिट्यूड शक्य आहे. तिचा हा व्हिडिओही हेच सांगणारा आहे. सोशल मीडियावर गाजत असलेला हा व्हिडिओ म्हणूनच पाहायला हवा..