पाहा, बॉलिवूड स्टार्सची दिवाळी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST
बॉलिवूडमध्ये दिवाळी उत्साहात साजरी झाली. बच्चन कुटुंबापासून तर कपूर कुटुंबापर्यंत सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीवर एक खास नजर...
पाहा, बॉलिवूड स्टार्सची दिवाळी...!
बॉलिवूडमध्ये दिवाळी उत्साहात साजरी झाली. बच्चन कुटुंबापासून तर कपूर कुटुंबापर्यंत सगळ्यांनी दिवाळी साजरी केली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीवर एक खास नजर...अमिताभ बच्चन यांचे दिवाळी सेलिब्रेशन सगळ्यात खास राहिले. अमिताभ यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केले. आमिर खानने आपल्या घरी दिवाळीची ग्रॅण्ड पार्टी दिली. या पार्टीत मुकेश अंबानींसह अनेक स्टार आलेत. आमिरची पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत पाहुण्यांचे स्वागत करताना दिसली. शाहरूख खानही दिवाळी बिझी दिसला. तो आधी अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीत सामील झाला आणि नंतर आमिरच्या दिवाळी पार्टीत पोहोचला. अजय देवगण, त्याची पत्नी काजोल या दोघांनी मुलांसोबत दिवाळी साजरी केली. अक्षय कुमार व टिष्ट्वकल खन्ना या दोघांनीही अशी मस्त ‘रोमॅन्टिक’ दिवाळी साजरी केली. शाहिद कपूरने मुलगी मीशासोबत दिवाळी एन्जॉय केली. करिना कपूरने लाडक्या तैमूरसोबत दिवाळी सेलिब्रेशन केले.