Join us

चित्रपटासाठी ‘या’ अभिनेत्रीने केली लाइव्ह डिलिव्हरी; लेबर रूममध्ये लावले तीन कॅमेरे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 17:47 IST

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता मेनन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र ‘कालीमन्नू’ हा तिचा चित्रपट वादाच्या भोवºयात ...

साउथची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता मेनन हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र ‘कालीमन्नू’ हा तिचा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला होता. कारण या चित्रपटात श्वेताने लाइव्ह डिलिव्हरी सीन्स शूट केले होते. केवळ पैशांसाठीच तिने लाइव्ह डिलिव्हरी शूट करण्याचे निर्मात्यांना सांगितल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘कालीमन्नू’ या चित्रपटासाठी डिलिव्हरीचा सीन लाइव्ह शूट करण्याचा निर्माते ब्लेसी यांनी निर्णय घेतला होता. महिलांसमोरील आव्हाने या विषयावर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी श्वेताने चित्रपटात डिलिव्हरी सीन्स शूट करण्याची निर्मात्यांकडे तयारी दर्शविली. निर्मात्याने तशा पद्धतीने सीन शूट केले. मात्र त्यानंतर ती चांगलीच अडचणीत सापडली होती. पुढे श्वेताने डिलिव्हरीची शूटिंग पैशांसाठी केली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र चाहत्यांनी तिच्यावर आरोपांचा सिलसिला कायम ठेवला. याविषयी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही डिलिव्हरीची रेकॉर्डिंग तेव्हापासून सुरू केली होती, जेव्हा श्वेता पाच महिन्यांची गर्भवती होती. तीन तासांच्या चित्रपटात लाइव्ह डिलिव्हरीचा सीन्स ४५ मिनिटांचा होता. श्वेताने मुलीला जन्म दिला होता, तिचे नाव सबाइना असे ठेवले होते. यासाठी श्वेतानेच होकार दिल्याचेही दिग्दर्शकांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना दिग्दर्शक ब्लेसी यांनी सांगितले की, ‘अशाप्रकारची शूटिंग करण्यासाठी श्वेताचे पती श्रीवाल्सन मेनन यांची परवानगी होती. शूटिंग अगोदर चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईच्या नानावटी रुग्णालयात पोहोचली होती. डिलिव्हरी रूममध्ये तीन कॅमेरे लावण्यात आले होते. शूटिंगदरम्यान रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स यांच्यासह प्रॉडक्शनचे तीन मेंबर्स उपस्थित होते. हा सीन शूट करण्यासाठी ब्लेसीने चित्रपटाची रिलीज थांबवून तब्बल सहा महिने प्रतीक्षा केली. अशातही चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसादच मिळाला होता. तर क्रिटिकच्या मते, ‘हा चित्रपट समाजाला संदेश देणार असून, तो प्रेरणादायी आहे.’ १९९० मध्ये श्वेताने ‘अनास्वरम’ या मल्याळम चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये नशीब आजमाविले. १९९४ मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेत सहभागही घेतला होता. बºयाच ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.