ऐकावे तर नवलच कंगना म्हणते, मी भारतीय महिलांचा परफेक्ट चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 12:09 IST
बॉलिवूड क्वीन कंगना राणौत स्वत:ला भारतीय महिलांचा परफेक्ट चेहरा समजते. कंगनाचे म्हणणे आहे जर तुम्ही आज भांडण नाही केला ...
ऐकावे तर नवलच कंगना म्हणते, मी भारतीय महिलांचा परफेक्ट चेहरा
बॉलिवूड क्वीन कंगना राणौत स्वत:ला भारतीय महिलांचा परफेक्ट चेहरा समजते. कंगनाचे म्हणणे आहे जर तुम्ही आज भांडण नाही केला तर लोक तुमचे जगणं मुश्किल करेल.बॉम्बे टाईम्स दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, मी स्वत:ला एक शूर मानते. आपल्या समाजात महिलांच्या मताला महत्त्व दिले जाते नाही. त्यांना नेहमीच डावलले जाते. महिला नेहमी अशा गोष्टींसाठी भांडताना दिसतात ज्यावर त्या विश्वास ठेवतात. मात्र अशा महिलांना समाजात जास्त पसंत केले जाते नाही. कंगना पुढे म्हणाली की, मी भारतीय युवा महिलांचा परफेक्ट चेहरा आहे. मात्र ही लज्जास्पदबाब आहे की ते हे मानत नाहीत. आज 'सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट'चा जमाना आहे. तुम्ही जर भांडलात नाहीत तर तुम्ही जगाल कसे ? महिलांना आज सगळ्यांची गरज आहे की तुम्हाला काही गोष्टींसाठी भांडावेच लागेल. कंगना राणौत बॉलिवूडमध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. आतापर्यंत कंगनाने अनेक जणांना बॉलिवूडमध्ये पंगा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ‘द इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’च्या या स्टेजवरचा कंगना व करणचा एक फोटो व्हायरल झाला होतो. या स्टेजवर कंगना व करण दोघांनीही प्रचंड मस्ती केली. इतकेच नाही तर याही वेळी कंगनाने करणची चांगलीच मजा घेतली. करण आपल्या शोमध्ये पाहुण्यांना काय पाजतो, असा प्रश्न कंगनाला ‘द इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’च्या स्टेजवर विचारला गेला. त्यावर कंगनाने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. होय, ‘करण मेहमानों को जहर पिलाता है, मुझसे पुछो,’ असे कंगना या म्हणाली. अर्थात कंगना हे गमतीगमतीत बोलली.ALSO READ : पहिल्यांदा बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचली कंगना राणौत! तुम्हीही जाणून घ्या कारण!!कंगान लवकरच मोठ्या पडद्यावर राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत.