Join us  

समुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:51 PM

नेहा धुपियाला देखील तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका टॉयलेटमध्ये जावे लागले होते.

अभिनेत्री आणि मॉडेल लीसा हेडन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. त्यामुळेच सोशल मीडियावर लीसा हेडनच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दुस-यांदा आई होण्यापासून ते बाळाला जन्म दिल्यापर्यंत सगळ्याच अपडेट लीसाने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय. नुकतेच लीसाने तिच्या बाळासोबत ब्रेस्टफिडींग करतानाचा फोटो शेअर केला आहे. यात ती बिचवर बसून बाळाला फिडींग करताना पाहायला मिळतेय. या फोटोंमुळे पुन्हा लीसा चर्चेत आली आहे. 

विशेषतः आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिलांना आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना अनेक महिलांना संकोच वाटतो. त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक सेलिब्रेटी सार्वजनिक ठिकाणी ब्रेस्टफीड करण्याला प्रमोट करताना दिसत आहेत. त्यामुळे लीसाचा हा फोटोदेखील यातलाच एक भाग असावा.

अनेकदा बाळाला सार्वजनिक ठिकाणी दुध पाजताना अनेक अवघडलेल्या परिस्थितीला महिलांना सामोरे जावे लागते. आपल्याच बाळाला दूध पाजण्यात संकोच वाटतो. नेहा धुपियाला देखील तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका टॉयलेटमध्ये जावे लागले होते. टॉयलेटमध्ये तिने तिच्या बाळाला बेस्टफिड केले होते.

टॉयलेट ही काय योग्य जागा नाही. पण मानसिकता आणि इतरांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोण मातांना अशा गोष्टी करायला भाग पाडतो. 'ब्रेस्टफिड' याकडे पाहण्याचा दृष्टीकोणही बदलण्याची गरज आहे. म्हणूनच नेहा धुपियानं काही दिवसांपूर्वीच भारतात  #freedomtofeed कॅम्पेनला सुरुवात केली आहे. या कॅम्पेनला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

टॅग्स :लीसा हेडननेहा धुपिया