Join us

​रविनाचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 08:41 IST

अभिनेत्री रवीना टंडन एक सामाजिक भान असलेली अभिनेत्री कलाकार आहे. याच सामाजिक भानापोटी रवीनाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पत्र ...

अभिनेत्री रवीना टंडन एक सामाजिक भान असलेली अभिनेत्री कलाकार आहे. याच सामाजिक भानापोटी रवीनाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पत्र लिहले असून वन्यजीवांसह पक्षी संवर्धन व संरक्षणाकडे लक्ष द्या,अशी कळकळीची विनंती तिने या पत्रातून केली आहे. मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्टमुळे वन्यजीवांवर पडणाºया दुष्परिणामांकडे तिने पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. हा कॉरिडोर बनल्यानंतर वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होईल, असे तिने म्हटले आहे. मुंबईच्या भोवतालचे बहुतांश वनक्षेत्र नष्ट करण्यात आले आहे. आता केवळ एक लहानचे हक्काचे क्षेत्र वन्यजीवांकडे उरले आहे. इंडस्ट्रियल कॉरिडोर बनल्यानंतर तेही त्यांच्याकडून हिरावून घेतले जाईल, असे तिने पत्रात लिहिले आहे. औद्योगिक विकासासाठी  १४८३ किमीचे हे कॉरिडोर विकसीत करण्याची सरकारी योजना आहे.