Join us

राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीचे निधन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 21:45 IST

दिग्गज अभिनेत्री ललिता चॅटर्जी यांचे बुधवारी कोलकाता येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांना सेलिब्रल स्ट्रोक ...

दिग्गज अभिनेत्री ललिता चॅटर्जी यांचे बुधवारी कोलकाता येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांना सेलिब्रल स्ट्रोक आला होता. त्यांना  लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. अखेर बुधवारी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६४ मध्ये त्यांनी ‘विभास’ या बांगला चित्रपटात उत्तमकुमार यांच्या अपोझिट काम केले होते. येथूनच त्यांनी त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. यावेळी त्यांनी काही बांगला चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी त्या मुंबईत आल्या. बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखविली. ‘रात अंधेरी थी, आप की कसम, तलाश, व्हिक्टोरिया नंबर २०३ आणि पुष्पांजली’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. ललिता चॅटर्जी यांनी ७० आणि ८० च्या दशकात बºयाच स्टेज प्रॉडक्शनमध्ये काम केले होते. पुुढे २०१३ मध्ये आलेल्या गौतम घोष यांच्या ‘शुन्यो अवन्को’ या चित्रपटानंतर त्या लाइमलाइटमधून गायब झाल्या. ललिता यांनी आदित्य विक्रम सेनगुप्ताच्या ‘जोनकी’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अरिंदम सिल यांच्या ‘आशे अबार शबोर’ या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.