Join us  

लक्ष्मीकांत बेर्डे-माधुरी दीक्षित यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, बॉन्डिंग पाहून चाहते झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:59 PM

Laxmikant Berde And Madhuri Dixit video goes viral:सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून लक्ष्मीकांत बेर्डेंचे चाहते इमोशनल झाले आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सलमान खान (Salman Khan) यांचा चित्रपट 'हम आपके है कौन?' (Hum Aapke Hai Kaun?) २८ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटात सलमान खान, माधुरी दीक्षित व्यतिरिक्त  रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, आलोक नाथ,अनुपम खेर, प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून लक्ष्मीकांत बेर्डेंचे चाहते इमोशनल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित आणि चित्रपटातील टफी डॉग शॉट देण्यासाठी तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षित दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बसलेली दिसते आहे. माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २८ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते इमोशनल झाले आहेत.

माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा व्हिडीओ माधुरीच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिले की, ‘बॉलिवूडचे सोनेरी दिवस’ दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, हल्लीची पिढी कधीच समजू शकणार नाही की लक्ष्मीकांत बेर्डे किती उत्तम अभिनेता होते. भारतीय चित्रपटांतील सर्वात विनोदी कलाकारांपैकी एक.
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमाधुरी दिक्षितसलमान खान