‘नूर’चा ट्रेलर लाँच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
‘नूर’चा ट्रेलर लाँच...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे.‘नूर ’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी सोनाक्षी सिन्हा सुंदर अशा ड्रेसिंगमध्ये आली होती. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सोनाक्षी सिन्हा. ‘नूर’च्या पोस्टरमध्ये सोनाक्षीने जसा हावभाव केला आहे तसाच तिने या पोस्टरकडे पाहत गालावर बोट ठेवून केला आहे. तिचा हा लुक मनमोहक वाटतो. पोस्टरकडे हात दाखवून जणूकाही सोनाक्षी आपल्याला असे सांगू इच्छिते आहे की, ‘ थिएटरमध्ये या आणि नूरची लाईफ पाहा!’ या फोटोत सोनाक्षीने तिच्या पायावर काढलेला टॅटू लक्ष वेधून घेतो. ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमावेळी सोनाक्षीला प्रेक्षकातून प्रश्न आला तेव्हा त्याचे उत्तर देताना तिने आनंदाने उडीच मारली. पाहा तिचा हा नॉटी अंदाज