Join us  

मुंबई पोलिसांमुळेच घाईघाईत केलं सुशांतचं पोस्टमार्टम... ! अखेर डॉक्टरांनी दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 12:24 PM

सुशांतचे पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

ठळक मुद्देकोरोना रिपोर्ट येण्याआधीच सुशांतचे पोस्टमार्टम का केले? यावर डॉक्टरांना समाधानकारक उत्तर देता न आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आता एक नवा खुलासा झाला आहे. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही त्रूटी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतचे पोस्टमार्टम करणाºया डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यास सांगितल्यामुळे हा रिपोर्ट देण्यात घाई झाली, अशी कबुली पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांनी दिली आहे.‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर सीबीआयच्या टीमने काही प्रश्न उपस्थित केले. सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात इतकी घाई का केली? असा प्रश्न सीबीआय टीमने पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांच्या टीमला केला. यावर डॉक्टरांच्या टीमने थेटपणे मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरूनच आम्ही रात्री उशीरा सुशांतचे पोस्टमार्टम केल्याचे डॉक्टरांनी सीबीआयला सांगितले. 

कोरोना रिपोर्ट येण्याआधीच सुशांतचे पोस्टमार्टम का केले? यावर डॉक्टरांना समाधानकारक उत्तर देता न आल्याचेही सूत्रांनी सांगितले.14 जूनला सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेला आढळला होता. यानंतर त्याच रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात आला होता.

या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी  लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.  रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. फासाची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत