Join us

​वाणी कपूरच्या ‘या’ नव्या गाण्याला ऐकायला लता मंगेशकर यांनी दिला नकार! वाचा, काय आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:45 IST

अभिनेत्री वाणी कपूरचा एक म्युझिक डान्स व्हिडिओ अलीकडे रिलीज झाला. याच व्हिडिओशीसंबंधित एक ताजी बातमी आहे.

अभिनेत्री वाणी कपूरचा एक म्युझिक डान्स व्हिडिओ अलीकडे रिलीज झाला. या व्हिडिओत वाणीने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या ‘नी मैं यार मनाना जी, चाहे लोग बोलियां बोले,’ या गाण्याच्या नव्या रिमिक्स व्हर्जनवर डान्स केलायं. पण याच व्हिडिओशीसंबंधित एक ताजी बातमी आहे. होय, वाणीच्या या व्हिडिओमधील नवे रिमिक्स गाणे म्हणे, लता मंगेशकर यांनी ऐकायलाही नकार दिला. मग वाणीचा हा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओतील वाणीचा परफॉर्मन्स पाहणे तर दूर.लतादीदींच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन गायिका यशिता शर्माने गायले आहे आणि हितेश मोदकने त्यास रिमिक्स दिले आहे. हे गाणे १९७३ मध्ये आलेल्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ या चित्रपटातील आहे.लतादीदी व मीनू पुरूषोत्तम यांनी हे ओरिजनल गाणे गायले होते. याच गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनला ऐकायला मात्र ललादींनी स्पष्टपणे नकार दिला. ‘मी या गाण्याचे रिमिक्स ना ऐकलेले आहे, ना मला ऐकायचे आहे. मला यावर काहीही बोलायचे नाही. बॉलिवूडच्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स आणि क्लासिक्ससोबतच्या छेडछाडीचा मी कायम विरोध केला आहे. मदन मोहन आणि लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या गाण्यांचे बीट्स आणि लिरिक्सची पूर्णपणे तोडफोड करत ते रिमिक्सच्या नावावर खपवले जातेयं. जणू ताजमहालातील जुन्या खोल्या तोडून त्याठिकाणी नव्या खोल्या बांधाव्यात. हा सगळा उपद्व्याप करणाºया कंपोझर्सला आपण काय केलेय, हे ठाऊक आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यात काहीही हशील नाही,’ असे लता मंगेशकर यावर म्हणाल्या.ALSO READ: ‘बेफिक्रे गर्ल’ वाणी कपूरच्या हाती लागला दोन ‘सुपरहिरों’चा ‘सुपरहिट’ चित्रपट!‘नी मैं यार मनाना नी’वर बोलताना पुढे त्या म्हणाल्या की, हे एक विशेष गाणे होते. जे ‘खुला गला भंगडा’ स्टाईलने गायलेले आहे. अशी गाण्यात माझी बहीण आशा भोसले तरबेज आहे. हे गाणे गाताना मी संभ्रमात होते. मी गाऊ शकेल की नाही, असे मला वाटत होते. पण मी ते गायले आणि हे गाणे सुपरहिट ठरले.