Join us  

लता दिदींना लहान बहीण मानायचे दिलीप कुमार, 13 वर्षे एकमेकांशी धरला होता अबोला, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 3:22 PM

लता दिदी आणि दिलीप कुमार या दोघांमध्ये मोठा भाऊ आणि लहान बहिणीसारखे प्रेम होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि  ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे दोघे आज या जगात नाहीत. पण त्यांच्या नावाशिवाय आणि कर्तृत्वाशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास कधीच लिहिला जाणार नाही. लता दिदी आणि दिलीप कुमार या दोघांमध्ये मोठा भाऊ आणि लहान बहिणीसारखे प्रेम होते. लता मंगशेकर दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. पण पण या नात्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा या दोघांनी एकमेकांशी 13 वर्षे अबोला धरला होता. पण नंतर जेव्हा दोघांची नाराजी दूर झाली. तेव्हा लतादीदींनी त्यांना राखी बांधायला सुरुवात केली आणि भाऊ-बहिणीचे नाते त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपले.

दिलीप कुमार यांच्यावरील नाराजीबद्दल लता मंगेशकर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, एके दिवशी संगीतकार अनिल विश्वास आणि दिलीप कुमार यांच्यासोबत मुंबईत ट्रेनमध्ये होत्या. अनिल विश्वास यांनी लतादीदींची दिलीप कुमार यांच्याशी ओळख करून देताना सांगितले की, ही मुलगी खूप छान गाते. मग दिलीप कुमारने नाव विचारले आणि नाव कळल्यावर मराठी आहे का असे विचारले. तेव्हा अनिल विश्वास यांनी हो म्हटलं. त्यावर दिलीप कुमार म्हणाले की, मराठी भाषिक लोकांसाठी उर्दू म्हणजे डाळ-भातासारखी आहे.

त्यांच्या टिप्पणीचे लता मंगेशकर यांना याचे वाईट वाटले.  दोघे हृषिकेश मुखर्जीच्या 'मुसाफिर या चित्रपटात ‘लागी नही छूटे’ हे गाणे एकत्र गाणार होते. गाणे रेकॉर्ड झाले आणि लतादीदींनी उत्तम गायले. दिलीपकुमार त्यांच्यासमोर नर्व्हस राहिले. पण दिलीप कुमार यांच्या टिप्पणीमुळे नाराज झालेल्या लता मंगेशकर यांनी त्यांच्याशी 13 वर्षे  बोलल्या नाही.  19970 मध्ये जेव्हा त्यांच्यातील मतभेद संपले. तेव्हा लता मंगेशकर यांनी दिलीप कुमार यांना राखी बांधली.

प्रख्यात लेखक खुशवंत सिंग यांनी 'द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'च्या ऑगस्ट 1970 च्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष अंकासाठी दोन्ही व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणण्याचा विचार केला. लता मंगेशकर यांना दिलीप कुमार यांच्या घरी आणण्याची जबाबदारी त्यांनी ज्येष्ठ पत्रकार राजू भारतन यांच्यावर सोपवली. लता मंगेशकर दिलीप कुमार यांना राखी बांधतील आणि मासिकाच्या मुखपृष्ठावर हा फोटो प्रसिद्ध होईल, ही खुशवंत सिंग यांची कल्पना होती.

खुशवंत सिंग यांनी हिंदू-मुस्लिम भाई भाई या शीर्षकाखाली हा फोटो प्रकाशित केला.  दिलीप कुमार आणि लता मंगेशकर पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. पण तो फोटो केवळ दाखवण्यासाठी नव्हता. तर दोघांनीही एकमेकांना भाऊ-बहीण म्हणून मनापासून स्वीकारले होते. 

टॅग्स :बॉलिवूडलता मंगेशकरदिलीप कुमाररक्षाबंधन