Join us

इंदर कुमारला अत्यंत शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप; ‘हे’ सेलिब्रिटी होते उपस्थित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 17:46 IST

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याने जगाचा निरोप घेतला असून, त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जुलै रोजी ...

बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याने जगाचा निरोप घेतला असून, त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जुलै रोजी २ वाजता हृदविकाराने त्याचे निधन झाले. २८ जुलै रोजीच सायंकाळी यारी रोड स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी स्मशानभूमित अत्यंत शोकाकुल वातावरण बघावयास मिळाले होते. ‘वॉण्टेड’मध्ये सलमान खानच्या भावाची भूमिका साकारणाºया इंदर कुमारच्या अंत्यसंस्काराला इंडस्ट्रीतील एकही बडा कलाकार बघावयास मिळाला नाही. मात्र बºयाचशा टीव्ही आणि बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. अयूब खान, टीना घई, डॉली बिंद्रा हे कलाकार यावेळी खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. तर इंदरच्या नातेवाईक अश्रुनयनांनी अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने सर्व वातावरण भावुक झाले होते. इंदर कुमार याने २० पेक्षा अधिक बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. त्यातील बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबतचे त्याचे चित्रपट खूपच गाजले. त्यातील ‘वॉण्टेड’ आणि ‘तुमको न भूल पाएंगे’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. दरम्यान, इंदरने नुकतेच ‘फटी पडी हैं यार’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. त्याचबरोबर आणखी एक चित्रपट त्याने पूर्ण केला आहे. काही दिवसांमध्ये हे चित्रपट रिलीज होणार आहेत. इंदर कुमारने बॉलिवूडमध्ये १९९६ मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून पाऊल ठेवले. २०१७ मध्ये आलेल्या ‘हु इज द फर्स्ट वाइफ आॅफ माय फादर’ हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. इंदर कुमार सलमान खानच्या खूपच क्लोज होता. इंदर सलमानला भाऊ आणि गुरू मानायचा. सलमानने त्याला कठीण प्रसंगात प्रचंड मदत केली होती. शिवाय त्याला अनेक चित्रपटांमध्ये संधीही मिळवून दिल्या होत्या. त्यामुळे सलमान त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होईल अशी चर्चा रंगली होती. परंतु तसे घडले नाही. सलमान २८ जुलैलाच त्याच्या ‘टायगर जिंदा हंै’ची शूटिंग पूर्ण करून मोराक्को येथून मुंबईत पोहोचला होता.