भूमी पेडणेकरला ‘भन्सालीं’ची लॉटरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:29 IST
'दम लगा के हैशा' या सिनेमातील यशस्वी पदार्पणानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला बॉलीवुडची मोठी लॉटरी लागलीय. बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय ...
भूमी पेडणेकरला ‘भन्सालीं’ची लॉटरी !
'दम लगा के हैशा' या सिनेमातील यशस्वी पदार्पणानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला बॉलीवुडची मोठी लॉटरी लागलीय. बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी आपल्या आगामी गुस्ताखियाँ या सिनेमासाठी भूमीच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय. गीतकार साहिर लुधियानवी, अमृता प्रीतम यांच्यावर आधारित या सिनेमासाठी गेल्या दीड वर्षांपासून कलाकारांचा विशेषतः नायिकेचा शोध सुरु होता. यासाठी भन्साली यांनी करीना कपूर-खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण यांचा विचारही केला होता. मात्र या स्टार अभिनेत्रींचं बिझी शेड्युल पाहता ते काही जुळून आलं नाही. अखेर अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी भन्साली यांनी भूमी पेडणेकर हे नाव फायनल केलंय. भूमीच्या आजवरील अभिनयानं भन्साली हरखून गेलेत. त्यामुळं या भूमिकेसाठी त्यांनी भूमीशी चर्चा केलीय. सध्या ती मनमर्झियाँ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. यानंतर गुस्ताखियाँमधील भूमीच्या एंट्रीची अधिकृत घोषणा करण्यात येईल..