Join us  

क्रिती सेनॉनच्या ताफ्यात आणखी एका गाडीची भर; किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 2:16 PM

Kriti sanon: क्रितीने नवीन मर्सिडीज Maybach GLS 600 ही कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे कारची किंमत थक्क करणारी आहे.

ठळक मुद्देयशाचा आलेख वेगाने सर करणाऱ्या क्रितीने नुकतीच एक ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे.

'हिरोपंती' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. उत्तम अभिनयाच्या जोरावर आज क्रिती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ती चर्चेत असते. अलिकडेच क्रितीचा मिमी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटासाठी क्रितीचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं. त्यामुळे सध्या क्रिती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटासोबतच क्रिती तिच्या नव्या गाडीमुळेही चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने एक नवीन कार खरेदी केली असून तिची किंमत ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत. 

यशाचा आलेख वेगाने सर करणाऱ्या क्रितीने नुकतीच एक ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे. त्यामुळे तिच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आणखी एका नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. क्रितीने नवीन मर्सिडीज Maybach GLS 600 ही कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे कारची किंमत थक्क करणारी आहे.

क्रितीने खरेदी केलेल्या कारची किंमत माहितीये का?

क्रितीने खरेदी केलेल्या Maybach GLS 600 या कारची किंमत २. ४३ कोटी रुपये इतकी आहे. तिच्या या नव्या कोऱ्या गाडीसोबत तिला सांताक्रूझ येथील मोदक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं. तिचा हा फोटो योगेन शहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

क्रिती लवकरच झळणार नव्या चित्रपटात

मिमी चित्रपटाच्या यशानंतर क्रिती लवकरच काही नव्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.  यात 'आदिपुरुष', 'बच्चन पांडे', 'भेडिया', 'गणपत', 'हम दो हमारे दो' या चित्रपटांचा समावेश आहे. 

टॅग्स :क्रिती सनॉनसेलिब्रिटी