Join us  

मी ‘सीक्वल क्वीन’! कृति खरबंदाला मिळाली नवी ओळख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:59 PM

‘यमला पगला दीवाना’च्या तिसऱ्या सीक्वलमध्ये आणि ‘हाऊसफुल4’मध्ये वर्णी लागलेली अभिनेत्री कृति खरबंदा हिची एक नवी ओळख निर्माण होऊ पाहते आहे. होय, यापुढे कृति खरबंदा ही बॉलिवूडची ‘सीक्वल क्वीन’ म्हणून ओळखली जाणार आहे.

‘यमला पगला दीवाना’च्या तिसऱ्या सीक्वलमध्ये आणि ‘हाऊसफुल4’मध्ये वर्णी लागलेली अभिनेत्री कृति खरबंदा हिची एक नवी ओळख निर्माण होऊ पाहते आहे. होय, यापुढे कृति खरबंदा ही बॉलिवूडची ‘सीक्वल क्वीन’ म्हणून ओळखली जाणार आहे. खुद्द कृति स्वत:ला ‘सीक्वल क्वीन’ म्हणू लागली आहे. अर्थातचं याला कारण आहे़ एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटांच्या सीक्वल कृतिच्या झोळीत पडले आहेत.अलीकडे एका मुलाखतीत कृति यावर बोलली. ‘राज रिबूट’, ‘गेस्ट इन लंडन’, ‘यमला पगला दीवाना फिर से’आणि ‘हाऊसफुल4’मध्ये या सगळ्या सीक्वलमध्ये काम करून मी ‘सीक्वल क्वीन’ बनलेय, असे कृति म्हणाली. मी स्टीरियोटाईप झालीय, असे नाही. कारण हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट होते. मला तशाचं भूमिका मिळतात, ज्या आव्हानात्मक असतात. तुम्हाला एखादी भूमिका मिळाली आणि ती दहा वेगवेगळ्या प्रकारे साकारायला सांगितले जात असेल, तर एक कलाकार या नात्याने यापेक्षा मोठे आव्हान काहीच नाही, असे कृति म्हणाली.कृति खरबंदाने ‘हाऊसफुल4’चे पहिले शेड्युल लंडनमध्ये पूर्ण केलेय. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सॅनन आणि पूजा हेगडेसोबत दिसेल. ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाईजीचे तीन भाग आधीच हिट झालेले आहेत. आता याच्या चौथ्या भागात कृति कुठल्या भूमिकेत दिसते, ते पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत.नुकतीच कृति ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्ये दिसली होती. अर्थात तिचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला.कृतिने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. कन्नड चित्रपटांतही तिने काम केले़ ‘राज रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.