Join us  

कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 7:38 PM

कृष्णाने बेडवर बसून मिररमध्ये हा सेल्फी घेतला असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देकृष्णा या फोटोत खूपच बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे नेटिझन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. कृष्णाचा भाऊ अभिनेता टायगर श्रॉफने देखील या फोटोवर कमेंट केली आहे.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तर तिचे अनेक बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.

आता कृष्णाने इन्स्टाग्रामवर तिचा एक बिकनी फोटो पोस्ट केला आहे. तिने बेडवर बसून मिररमध्ये हा सेल्फी घेतला असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कृष्णा या फोटोत खूपच बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे नेटिझन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. कृष्णाचा भाऊ अभिनेता टायगर श्रॉफने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने माकडाने तोंडावर हात ठेवल्याचा इमोजी पोस्ट केला आहे तर त्यावर कृष्णाने हार्टचा इमोजी पोस्ट करत रिप्लाय दिला आहे.

काही महिन्यांआधीच कृष्णाने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर तिने तिच्या हॉट फोटोंचा सपाटाच लावला. आता तर ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

कृष्णाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोत तिने बिकनी घातली होती आणि यात तिचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. हा फोटो पोस्ट करत कृष्णाने लिहिले होते की, तू मला नेहमीच खळखळून हसवतो. माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत या वर्षांत माझी ओळख झाली. हे वर्षं माझ्यासाठी खूपच छान होते.

कृष्णाचा सेक्सी अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफ