Join us  

जॅकीची लेक कृष्णा श्रॉफचा हा अवतार तुम्ही कधीच पाहिला नसेल; चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:40 AM

नॉट योर बेब’ असे कॅप्शन देत कृष्णाने हे फोटो शेअर केले आहेत. कृष्णाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

ठळक मुद्देकृष्णाने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही.

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याची लेक आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) सतत सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. बिकनीतील बोल्ड फोटोंमुळे कृष्णा अनेकदा ट्रोलही होते. आता पुन्हा कृष्णाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र हे फोटो पाहून चाहते काहीसे हैराण आहेत. कारण प्रथमच कृष्णाने शेअर केलेल्या फोटोत हॉटनेसचा तडका नाहीये.कृष्णाने चार फोटो शेअर केलेत. या चारही फोटोत ती वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. ब्लॅक कलरच्या या फोटोत कृष्णा कमालीची सुंदर दिसतेय. (Krishna Shroff latest photoshoot went viral on internet )

‘नॉट योर बेब’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. कृष्णाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘पहिल्यांदा तुला कपड्यांत पाहिले,’ असे एका युजरने लिहिले आहे तर अन्य एकाने ‘पूर्ण कपड्यांत तू सुंदर दिसतेय,’ अशी कमेंट करत, कृष्णाची फिरकी घेतली आहे. तर नशीब, तू कपडे घातलेस, असे एकाने लिहिले आहे.

कृष्णाने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. कधी या बोल्ड फोटोंमुळे तर कधी रिलेशनशिप स्टेटसमुळे कृष्णा सतत चर्चेत असते.कृष्णा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते. असे म्हणतात की, करण जोहरने 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी कृष्णाला ऑफर दिली होती. पण कृष्णाने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटच्या पदरात पडली. कृष्णाला टॅटू काढण्याचा छंद आहे.  शरीराच्या अनेक भागांवर तिने टॅटू गोंदवले आहेत.

टॅग्स :कृष्णा श्रॉफजॅकी श्रॉफ