Join us  

प्लास्टिक सर्जरी करणे ही होती आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक, खुद्द अभिनेत्रीने दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 2:43 PM

ही अभिनेत्री तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीपेक्षा तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे जास्त चर्चेत असते.

ठळक मुद्देअधिक सुंदर दिसण्यासाठी कोएनाने नाकाची सर्जरी केली मात्र ती फसली होती. त्यानंतर दिग्दर्शकांनी तिला सिनेमात काम देणं बंद केले. प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर जवळपास सहा महिने कोएना घरीच बसली होती.

अभिनेत्री कोएना मित्राचा आज वाढदिवस असून तिचा जन्म कोलकत्तामधील आहे. तिने तिच्या करियरच्या सुरुवातीला मॉडलिंग केले होते. त्यानंतर ती व्हिडिओ अल्बममध्ये झळकली. तिने रोड चित्रपटातील खुल्लम खुल्ला या आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिने मुसाफिर, अपन सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. मुसाफिर या चित्रपटातील साकी साकी या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे तिला साकी गर्ल म्हणून ओळखले जाते. 

कोएना तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीपेक्षा तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे जास्त चर्चेत असते. अधिक सुंदर दिसण्यासाठी कोएनाने नाकाची सर्जरी केली मात्र ती फसली होती. त्यानंतर दिग्दर्शकांनी तिला सिनेमात काम देणं बंद केले. प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर जवळपास सहा महिने कोएना घरीच बसली होती. यानंतर कोएना लाइमलाइटपासून दूर गेली. 

कोएना काही महिन्यांपूर्वी बिग बॉसच्या घरात झळकली होती. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिने दिलेल्या एका मुलाखतीत प्लास्टिक सर्जरीबाबतचा खुलासा केला होता असे अमर उजालाने त्यांच्या वृत्तात म्हटले होते. त्यांच्या वृत्तानुसार कोएनाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, या इंडस्ट्रीत सगळेच असे करतात, काही लोक सांगतात तर काही लोक सांगत नाहीत. हा काही गुन्हा किंवा पाप नाही. मला याबाबत बोलायची इच्छा नाहीय. मी यावर बोलले आणि गेली आठ-नऊ वर्ष ही गोष्ट माझा पिच्छा सोडत नाहीये. लोक मला सतत यावरुनच प्रश्न विचारतात. पण हे माझं आयुष्य आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने जगणार. माणसाकडून आयुष्यात खूप चुका होतात. मात्र जोपर्यंत त्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेत नाहीत तोवर ती गोष्ट बरोबर आहे की चुकीची हे कसं कळणार.'' 

कोएनाच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले होते की, प्लास्टिक सर्जरी ही तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. 

टॅग्स :कोएना मित्रा