Join us  

लग्नाआधीच भावी पतीचा झाला मृत्यू, वयाच्या 10 व्या वर्षीच खांद्यावर पडली कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 8:00 AM

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली.

बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आल्या , ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत: ची ओळख निर्माण केली. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, त्यांनी अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आणि एकापेक्षा एक सिनेमात  काम केले. आज आपण अभिनेत्री नंदाबद्दल बोलत आहोत. सौज्ज्वळ चेह-याची अभिनेत्री नंदा यांनी अनेक वर्षे चित्रपट सृष्टी गाजवली.

अभिनेत्री नंदा यांचा जन्म 8 जानेवारी 1939 रोजी झाला होता. नंदाचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी हे एक यशस्वी अभिनेते आणि मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक होते. नंदा त्यांच्या काळातील एक अतिशय सुंदर आणि हुशार अभिनेत्री होत्या. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. एक दिवस नंदा शाळेतून परत आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की उद्या तयार रहा, चित्रपटासाठी तुझे शूट आहे. यासाठी आपल्याला आपले केस कापून घ्यावे लागतील. नंदा म्हणाल्या की मला कोणतेही शूटिंग करायचे नाही.

पण नंतर नंदा यांच्या आईने त्यांची समजूत काढली. या चित्रपटाचे नाव होते 'मंदिर'. चित्रपटाचे दिग्दर्शक नंदा यांचे वडील होते पण दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला. घराची संपूर्ण जबाबदारी नंदा यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी रेडिओ आणि स्टेजवरही काम करण्यास सुरवात केली.

नंदा हिचे मावस काका व्ही. शांताराम यांच्या घरी एकदा लग्न होते. त्या समारंभात नंदा साडी घालून गेल्या, त्यांना पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या पुढील चित्रपटात हिरोईन म्हणून घेणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट होता ‘तुफान और दिया’ (१९५६). नंदा यांच्या आयुष्यातील हा पहिला हिंदी चित्रपट. यानंतर वेगवेगळ्या भूमिका करून नंदा यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. सगळ स्थिरस्थावर झाल्यावर नंदा यांनी विवाह करून स्वत:चा संसार थाटावा, असे तिच्या कुटुंबाला वाटत होते. पण नियतीला कदाचित हे मान्य नसावे.

नंदा दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यावर प्रचंड प्रेम करायच्या. देसाई सुद्धा त्यांच्या प्रेमात होते. पण नंदा यांच्या लाजाळू स्वभावामुळे मनमोहन यांना आपले प्रेम व्यक्त करण्याची कधीच संधी मिळाली नाही. अखेर मनमोहन यांनी लग्न केले. मनमोहन यांच्या लग्नामुळे नंदा एकाकी पडल्या. पण कालांतराने मनमोहन यांच्या पत्नीचे निधन झाले आणि नंदाच्या आयुष्यात पुन्हा एकदा त्यांचे प्रेम परतले. अर्थात तोपर्यंत नंदा यांनी वयाची पन्नाशी गाठली होती. मनमोहन यांच्या नंदा यांच्यापुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली. 1992 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी नंदा यांनी मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला.

साखरपुड्यानंतरही दोन वर्षे नंदा व देसाई यांचे लग्न होऊ शकले नाही आणि एकदिवस एका अपघातात देसाई यांच्या मृत्यूचीच बातमी नंदा यांना मिळाली. नंदा हा आघात पचवू शकल्या नाही. 2014 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी नंदा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

टॅग्स :नंदा