Join us  

म्हणून अशा प्रकारच्या सिनेमात काम करत नाही रितेश देशमुख, वाचून तुम्हीही म्हणाल 'लयभारी' !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:07 PM

Riteish Deshmukh told about his Filmy Carrier: मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान व राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करत असतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो.

'लयभारी' मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला मुलांच्या जन्मानंतर कुटुंबासह मुलांची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव झाली आहे. दोन मुलांचा पिता बनल्यामुळेच की काय आपल्या सिनेमांच्या निवडीबाबतही रितेश सिलेक्टिव्ह झाला आहे.

डबल मिनिंगच्या डायलॉगला असणा-या सिनेमांना  रितेशने नकार देतो. ग्रेट ग्रँड मस्ती हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर डबल मिनिंगचे डायलॉग असणा-या सिनेमात काम करणार नसल्याचं रितेशनं म्हटलं होतं. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या समोर शरमेने मान खाली घालावी लागेल अशा सिनेमात काम करणार नाही असा निर्धार रितेशने केला होता. त्यामुळे टोटल धमाल सारखा  पूर्णपणे कॉमेडी असलेल्या सिनेमात  कोणतेही डबल मिनिंग डायलॉग असणार नाहीत असं आश्वासन मिळाल्यानंतर रितेशनं या सिनेमात काम करण्यास होकार दिला होता. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलिया या जोडीकडे पाहिले जाते. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा देशमुख यांना दोन मुले आहेत. रिहान आणि राहील हे दोन्ही मुलंदेखील चर्चेत येत असतात. त्यांच्या मुलांचे फोटो ते अनेकवेळा त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. पण त्या दोघांनाही खूपच कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान व राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करत असतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो.

याबाबत रितेशने सांगितले होते की, मुलांना सगळ्यांपासून दूर ठेवू शकत नाही.घरातून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर लपून तर जाऊ शकत नाही. मीडिया तर सगळीकडे असणार आहे. त्यामुळे घरी जे संस्कार दिले आहेत. मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे. तेवढे ते करतात. फोटोग्राफर दोन फोटो काढून निघून जातात.

 

रितेश पुढे म्हणाला की, बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तिथे मीडिया नसते. पण जिथे मीडिया असते तिथे आदरपूर्वक त्यांना त्यांचे काम करू देतो. तेही आम्हाला आदराने वागणूक देतात. रितेश आणि जेनेलियाचं मुलांना दिलेल्या संस्कारासाठी कौतूक करावं तेवढं कमीच आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा