Join us  

‘या’ छोकरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीये का? एका दांडिया नाईट्ससाठी घेते इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:43 PM

Falguni Pathak's Income : ती नाही तर किमान तिची गाणी प्रत्येक दांडिया नाईट्समध्ये हमखास वाजतात आणि तरूणाई तिच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचते.

ठळक मुद्दे1998 हे साल तर तिच्यासाठी मोठी संधी घेऊन उगवले. युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने तिचा पहिला अल्बम बनवला.

नवरात्र आणि गरबा हे एक अतुट समीकरण आहे. तसेच गरबा आणि फाल्गुनी पाठक असेही एक समीकरण आहे. ती नाही तर किमान तिची गाणी प्रत्येक दांडिया नाईट्समध्ये हमखास वाजतात आणि तरूणाई तिच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचते. गुजराती गरब्याला जगभरात नावारूपास आणणा-या या फाल्गुनी पाठक बद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चाळीशी पार असलेली फाल्गुनी पाठक हिला नवरात्रीच्या मौसमात प्रचंड मागणी असते. अगदी गुजरातपासून तर साता समुद्रापार लोक तिला बोलवतात. दांडिया नाईट्सच्या एका परफॉर्मन्ससाठी फाल्गुनी किती पैसे घेते माहितेय? तर कोट्यवधी. होय, दोन वर्षांपूर्वी एका परफॉर्मन्सासाठी ती दीड कोटी रूपये घ्यायची. सुरुवातीच्या काळात ही रक्कम दोन ते तीन कोटीच्या घरात होती.  

गुजरातच्या एका मध्यवर्गीय कुटुंबात फाल्गुनीचा जन्म झाला. घरात फाल्गुनी पाचवी. तिच्या आधी चार मुली होत्या. पाचव्यांदा आई-वडिलांना मुलगा हवा होता. पण झाली मुलगीच. मग काय, आईवडिलांनी फाल्गुनीलाच मुलगा म्हणून वाढवले. मुलाचे कपडे, बॉयकट असे सगळे.चौथीत असताना घराजवळच्या दांडियामध्ये कोरसमध्ये गायला उभी झालेली फाल्गुनी अचानक गाणे सुरु झाल्यावर ठेका पकडून नाचू लागली. तिचा तो अंदाज पाहून पब्लिक बेभान झाली. मग काय, आयोजकांनी तिला एकटीचा परफॉर्मन्स ठेवला आणि काय आश्चर्य फाल्गुनीने दांडियाची ती रात्र अक्षरश: गाजवली.

पुढे फाल्गुनीला ऑर्केस्ट्रामधून बोलवले आले. पण बाबांनी थेट नकार दिला. फाल्गुनीने काय करावे तर सर्वांची नजर चुकवून ती रात्री ऑर्केस्ट्राला गेली. बाबांनी चोप दिला. पण ते फाल्गुनीला थांबवू शकले नाहीत. दहा वर्षांची असताना तिला एका गुजराती सिनेमात गाण्याची संधी मिळाली आणि तिथून दांडिया आणि फाल्गुनी असे जणू समीकरण रूढ झाले. मुंबईपासून तिला दांडिया नाईट्ससाठी बोलवणे येऊ लागले.

1998 हे साल तर तिच्यासाठी मोठी संधी घेऊन उगवले. युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने तिचा पहिला अल्बम बनवला. दांडिया पण लूक मात्र पॉप असे ‘याद पिया की आने लगी...’ हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात शेवटच्या सीनमध्ये फाल्गुनी झळकली आणि फाल्गुनी स्टार झाली. पुढे मैने पायल है छनकाई, मेरी चुनर उडउड जाये अशा तिच्या अनेक गाण्यांनी तरूणाईला वेड लावले.

90 व्या दशकात शेकडो म्युझिक चॅनल्स आणि लाखो रिमिक्स गाण्यांमुळे फाल्गुनी काहीशी मागे पडली. पण तिचा दांडिया मात्र कायम सुपरहिट राहिला.

 

टॅग्स :फाल्गुनी पाठक