Join us  

विद्यार्थांना मारहाण केल्याने तुरुंगात गेलेला प्रसिद्ध अभिनेता,म्हणाला, "मला कॉलेजमधून काढून टाकलं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:33 PM

FTII च्या विद्यार्थ्यांना मारल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्याला कॉलेजमधून टाकलेलं काढून, खुलासा करत म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता किरण कुमार त्यांच्या सुखी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'धडकन', 'तेजाब', 'खुदा गवाह' यांसारख्या अनेक चित्रपटांत काम करुन त्यांनी ९०चं दशक गाजवलं. त्यांचे वडिलही प्रसिद्ध अभिनेता होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कॉलेज जीवनातील एक आठवण सांगितली. 

किरण कुमार यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्युट(FTII)मध्ये शिकत असतानाचा एक किस्सा सांगितला. विद्यार्थ्यांना मारहाण केल्यामुळे किरण यांना तुरुंगात जावं लागलं होतं. किरण कुमार यांचा स्वभाव रागीट होता. कॉलेजमध्ये नेहमीच अभिनय आणि दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद व्हायचे. किरण कुमार अभिनय विभागात होते. आणि दिग्दर्शन विभागातील काही विद्यार्थ्यांबरोबर त्यांचं भांडण झालं होतं. 

ते म्हणाले, "आम्ही त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली होती. पोलीस तिथे आल्यानंतर मला आणि माझ्या मित्रांना घेऊन गेले. त्यानंतर आमचे गुरू तंजिया साहेब यांनी पोलीस स्टेशनला येऊन आमची सुटका केली. पण, आमचे मुख्याध्यापक खूप चिडले होते. त्यांनी आम्हाला कॉलेजमधून काढून टाकलं होतं." 

"आम्हाला कॉलेजमधून काढून टाकल्याने अभिनय विभागातील अन्य विद्यार्थ्यांनी ४५ दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर सिनेसृष्टीतील लोकांना बोलवलं गेलं होतं. तेव्हा बीआर चोप्रा आले होते. "तू तर असा नव्हता. मग हे कधीपासून करायला लागला? असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांची माफी मागितली आणि त्यानंतर मला कॉलेजमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला," असंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :किरण कुमारएफटीआयआयसेलिब्रिटी