Join us  

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर घरातच बंदिस्त होते किरण कुमार, अशी घेतली काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:42 PM

योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतल्याने आपण कोरोनावर मात करू शकतो असेही किरण कुमार म्हणाले.

 14 मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी स्वतःला क्वारंटाईन केले होते. विशेष म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नव्हती. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास कोणतीही समस्या जाणवत नव्हती. पूर्णपणे व्यवस्थित होते. तरी  कोरोनाची लागण झाल्याचे समजताच संपूर्ण कुटुंबच चिंतेत होते. लक्षणं आढळली नसल्याने डॉक्टरांच्या मदतीने घरातच क्वारंटाइन होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. माझं घरं दुमजली असल्यामुळे मला घरात राहण्यास कोणतीच अडचण येत नाहीये”, असं किरण कुमार म्हणाले.

त्यांनी सांगितल्यानुसार, ते डिस्पोजेबल ताटात जेवतात आणि स्वतःची खोली स्वतः स्वच्छ करतात. ते घरातील दुस-या मजल्यावर एकटे आयसोलेशनमध्ये राहात आहेत. ते म्हणाले, मी माझ्या पत्नीला माझ्यासाठी डिस्पोजेबल भांडी खरेदी करण्यास सांगितले. ती माझे जेवण पाय-यांवर ठेवते आणि मी कुणाच्याही संपर्कात न येता, ते खोलीत आणतो. जेवतो आणि नंतर प्लेट्स डिस्पोज करतो. मी स्वतः पलंगावरची चादर बदलतो आणि खोली स्वतः स्वच्छ करतो.

योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतल्याने आपण कोरोनावर मात करू शकतो असेही किरण कुमार म्हणाले. कोरोनाव्हायरसला घाबरू नका.सर्वात आधी मनात कसलीच  भीती बाळगु नका. आता या व्हायरससोबतच जगायची सवय तर करावीच लागणार. नक्कीच कोरोनानंतर प्रत्येकाचे आयुष्यही पूर्वीसारखे राहणार नसून खूप बदलणार आहे. नव्या बदलांसह आता आपल्यालाही जगावे लागणार हीच काळाची गरज असल्याचे आता प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :किरण कुमारकोरोना वायरस बातम्या