Join us  

लक्झरी कार सोडून ऑटोरिक्षाने प्रवास करताना दिसली ही अभिनेत्री; 9 वर्षांपासून आहे चित्रपटांपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:52 PM

बॉलिवूडच्या अनेक इव्हेंटला ती दिसते. पण चित्रपटांचे म्हणाल तर सध्या तिच्याकडे एकही चित्रपट नाही.

ठळक मुद्देमध्यंतरी किम तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते.

‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. बॉलिवूडच्या अनेक इव्हेंटला ती दिसते. पण चित्रपटांचे म्हणाल तर सध्या तिच्याकडे एकही चित्रपट नाही. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली.  यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली. पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. किमबद्दल हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, अलीकडे किम लक्झरी कार सोडून ऑटो रिक्षातून प्रवास करताना दिसली.

मीडियाचे कॅमेरे बघताच किम हसू लागली. पण लक्झरी कार सोडून ऑटोमधून प्रवास करण्याची वेळ तिच्यावर का आली, असा प्रश्न अनेकांना पडला.मध्यंतरी किम तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण हे अफेअर फार काळ टिकले नाही.

अलीकडे दोघांचे ब्रेकअप झाले. हर्षवर्धन याच्याआधी किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडले गेले. सर्वप्रथम क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत तिच्या अफेअरची चर्चा झाली. यानंतर  स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला तिने डेट केले. कार्लोस व किम दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़  पण 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

टॅग्स :किम शर्मा