Join us  

कुणाचे काय तर कुणाचे काय... कोरोनामुळे या अभिनेत्रीला चक्क आठवलीय बिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:36 AM

या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकिमच्या या पोस्टवर तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या पोस्टमुळे काही जण किमच्या सेन्स ऑफ ह्युमरला दाद देत आहेत तर काहींनी कोरोनासारख्या गंभीर गोष्टीची मस्करी करणे चुकीचे असल्याचे तिला सुनावले आहे.

कोरोनामुळे जगभरातील लोक चिंतेत आहे. पण कोरोना हे नाव ऐकताच एका अभिनेत्रीला बिअर आठवली असून तिने तशी पोस्टदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या पोस्टमुळे या अभिनेत्रीला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले आहे. अभिनेत्री किम शर्माने इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आपल्याला तिच्यासोबत अभिनेत्री प्रीती झांगियानीला देखील पाहायला मिळत आहे. 

किमने या फोटोसोबत लिहिले आहे की, बँकॉकमधील हा फोटो असून आम्ही त्या रात्री प्रचंड धमाल मस्ती केली होती. त्या काळात कोरोनाचा अर्थ केवळ एक फॅन्सी बिअर एवढाच होता. 

किमच्या या पोस्टवर लगेचच प्रीतीने देखील उत्तर दिले आहे. तिने लिहिले आहे की, आमच्यासाठी नाईटआऊटचा अर्थ म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर ज्या प्रमाणे कपडे घालतात तसे घालायचे आणि कोणताही मेकअप करायचा नाही. 

किमच्या या पोस्टवर तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या पोस्टमुळे काही जण किमच्या सेन्स ऑफ ह्युमरला दाद देत आहेत तर काहींनी कोरोनासारख्या गंभीर गोष्टीची मस्करी करणे चुकीचे असल्याचे तिला सुनावले आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात आपलं थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा - कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दिल्ली, केरळ आणि जम्मूमध्ये मल्टीप्लेक्स आणि थिएटरदेखील बंद करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढत धोका पाहता बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण स्टारर आगामी सिनेमा सूर्यवंशी देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला असून या चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच सलमान खान आणि हृतिक रोशन यांनी त्यांचे परदेशात होणारे कॉन्सर्ट रद्द केले आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकिम शर्मा