Join us  

इंटरनेटवर ट्रेंड होतोय कियारा अडवाणीचा मनालीमधील फोटो, बर्फात अशी करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 4:17 PM

Kiara advani are enjoying snowfall in manali : कियाराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मनालीमध्ये आपला आगामी सिनेमा ‘भूल भुलैया -२’च्या शूटिंग करते आहे. इन्स्टाग्रामवर तिने बर्फात एन्जॉय करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कियारा व्हाइट टॉप, वूलन टोपी आणि गुलाबी ग्लोव्ह्ज घातलेले  दिसते आहे. 'स्नो ग्लो' असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. 

कार्तिक आर्यन आणि कियाराची मुख्य भूमिका असलेला 'भुल भुलैया २' चे शूटिंग कोरोनामुळे थांबले होते आणि आता सिनेमाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे.   उर्वरित  शूटिंग मुंबईत आणि त्यानंतर मार्चमध्ये लखनऊमध्ये होणार आहे. अभिनेत्री तब्बू देखील हॉरर कॉमेडीमध्ये आहे.  हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचे दोन नवे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये कियारा आणि कार्तिक एकत्र दिसतायेत.  दोघांची केमिस्ट्री बघून सिनेमांविषयची प्रेक्षकांच्या उत्सुकता आणखी वाढली आहे,  हा सिनेमा २००७ मधील अनीस बज्मी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी भूल भुलैयाचा सिक्वल आहे.  अक्षय कुमार, शायनी आहुजा, विद्या बालन आणि अमीषा पटेल यांनी ह्या चित्रपटात अभिनय केला होता.

सिनेमात नवीन पात्रांसह वेगळी कथा दर्शविली जाईल, असा निर्मात्यांचा दावा आहे.  यात मूळ चित्रपटाच्या दोन गाण्यांचा देखील समावेश असेल.  आता चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :कियारा अडवाणी