Join us  

लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुषी कपूरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:11 PM

गेल्यावर्षी जान्हवी कपूरनेही देखील लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल 2018 मध्ये पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला होता.

लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल 2019 दणक्यात सुरूवात झाली आहे. फॅशनच्या जलव्यासोबत बॉलिवूड तारका आपल्या फॅशन स्टाइलने सा-यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या लॅक्मे फॅशन विकमध्ये पहिल्यांदाच खुशी कपूरनेही आपला जलवा दाखवला तिनेही रॅम्पवॉक करत या सा-यांची मनं जिंकली आहेत. यावेळी घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे खुशी कपूरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.यावेळी तिने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये खुशी  स्टनिंग दिसत होती.

तिने ग्रे कलरचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट ड्रेसवर मॅचिंग ग्रे हील्स, चोकर नेकलेस यामुळे तिच्या सौंदर्यांला चार चाँद लागले होते. गेल्यावर्षी  जान्हवी कपूरनेही देखील लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल 2018 मध्ये पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला होता. आता यावर्षी बहीण खुशी कपूरनेही सहभागी होत ग्लॅमर इंडस्ट्रीत आपले एक पाऊल पुढे टाकले आहे. 

बॉलिवूड एन्ट्रीबद्दलही खुशीने सांगितले होते की, मी बॉलिवूडमध्ये येणार आणि यासाठी मी करण जोहरला डोळे बंद करून फॉलो करणार. पण माझ्या को-स्टारची निवड मात्र माझे पापा करतील, असे खुशी म्हणाली.  जान्हवीची छोटी बहिण खुशी कपूरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. याबाबतचा खुलासा जान्हवीने नुकताच केला आहे.अनीता श्रॉफ यांच्या चॅट शोमध्ये जान्हवीने सांगितले की, 'खुशी कपूर न्यूयॉर्कमधील फिल्म अॅकाडमीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत विचार करणार आहे.' 

जान्हवी व खुशीमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि ते एकत्र खूप एन्जॉय करतात. याबाबत जान्हवी म्हणाली, 'आमच्यात भांडणे फक्त तेव्हा होतात जेव्हा खुशी माझे कपडे चोरून घालते. आम्ही कपडे शेअर करतो. पण तिने मला सांगितले पाहिजे. जर तिने न सांगता गपचुप माझे कपडे वापरले की आमच्यात भांडणे होतात.'

टॅग्स :खुशी कपूरजान्हवी कपूर