‘हा’ खान आहे कल्की कोच्लिनचा ‘चाईल्डहूड क्रश’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:47 IST
शाहरूख खानवर जगभरातील तरूणी भाळतात. पण केवळ तरूणीच नाही. शाहरूख खानवर भाळणा-यांमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही आहे. यातलेच एक नाव ...
‘हा’ खान आहे कल्की कोच्लिनचा ‘चाईल्डहूड क्रश’
शाहरूख खानवर जगभरातील तरूणी भाळतात. पण केवळ तरूणीच नाही. शाहरूख खानवर भाळणा-यांमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही आहे. यातलेच एक नाव म्हणजे, अभिनेत्री कल्की कोच्लिन. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द कल्कीनेच तिच्या मनातले हे गुपित उघड केले. शाहरूख मला प्रचंड आवडतो. तो माझा ‘चाईल्डहूड क्रश’ आहे, असे तिने सांगितले.इंडस्ट्रीतल्या कुण्या ‘खान’सोबत स्क्रीन शेअर करायला तुला आवडेल, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारला गेला होता. यावर क्षणाचाही विलंब न करताना कल्कीने शाहरूख खानचे नाव घेतले. खरे तर मला तिन्ही खानसोबत काम करायला आवडेल. पण यातला माझ्या सगळ्यात आवडीचा कोण, असे विचाराल तर तो शाहरूख खान आहे, असे ती म्हणाली. त्याच्यावर माझा क्रश होता. रिअल लाईफमध्ये मी त्याला भेटलेय. तो खूप चार्मिंग आहे, असे ती म्हणाली. तुझी जोडी कुणासोबत चांगली दिसते, असे तुला वाटते, या एका प्रश्नावर कल्कीने कुणाचे नाव घेतले असेल? तर रणबीर कपूरचे. होय, मी रणबीर कपूरसोबत सुंदर दिसते, असे ती म्हणाली. मी त्याच्यासोबत काम केले आहे. तो अतिशय नॅचरल अॅक्टर आहे. भविष्यातही त्याच्यासोबत काम करायला मला आवडेल, असे ती म्हणाली. आता अॅक्टरनंतर डायरेक्टरची लिस्ट कल्कीसमोर केली गेली. तुला कुण्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल, असे तिला विचारले गेले. यावर विशाल भारद्वाज असे उत्तर तिने दिले. लवकरच कल्की ‘जिया और जिया’ आणि ‘रिबन’ या चित्रपटात दिसणार आहे.ALSO READ: Must Read : ‘त्या’ न्यूड फोटोवर पुन्हा बोलली कल्की कोच्लिन!मध्यंतरी कल्की ‘एअरलिफ्ट’ फेम अभिनेता जिम सर्भ याला कल्की डेट करत असल्याची चर्चा कानावर आली होती. दोघे लग्न करणार,अशीही चर्चा होती.अर्थात याबाबत कल्कीला विचारले असता, तिने यास नकार दिला होता. सध्या तरी माझा असा कुठलाही इरादा नसल्याचे ती म्हणाली. कल्की ही अनुराग कश्यपची एक्सवाईफ आहे. २०११ मध्ये दोघांचाही विवाह झाला होता आणि २०१५ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला होता.