Join us

​‘काबील’मध्ये कॅटरिनाचे संशेनल रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:21 IST

हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ एका हटके अंदाजात दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिकच्या आगामी ...

हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ एका हटके अंदाजात दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिकच्या आगामी ‘काबील’मध्ये कॅटरिना आयटम नंबर करताना दिसू शकते. या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळावी यासाठी दिग्दर्शक संजय गुप्ता आयटम नंबरसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. राकेश रोशन यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘काबील’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता करीत आहेत. यात हृतिक रोशन व यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट गंभीर विषयावर आधारित असल्याने यात काही संसेशन असावे यासाठी संजय गुप्ता आग्रही आहेत. संजयला हे संसेशन आयटम नंबरच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे. यासाठी चित्रपटात एक दोन आयटम नंबर असावे असे त्याला वाटते. यामुळे बॉक्स आॅफिसवर चांगली ओपनिंग मिळण्याचे चांसेसही वाढतात असा त्याचा समज आहे. संजय आपल्या चित्रपटात आयटम नंबर ठेवतोच. त्याचा मागील चित्रपट ‘शूट आऊट वडाला’मध्ये देखील अनेक आयटम नबर्स होते. ‘काबील’मधील आयटम नंबरसाठी प्रियांका चोप्रा व सनी लिओनीच्या नावाची चर्चा आहे. प्रियांका व रोशन कुुटुंबाचे चांगले संबंध असले तरी मात्र प्रियांकाने यासाठी नकार दिला असल्याचे समजते. प्रियांका बरेच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा एकादा सक्रिय व्हायचे असले तरी त्यासाठी आयटम नंबर योग्य ठरणार नाही असे तील वाटतेय. यासाठी ती दमदार भूमिकेच्या शोधात आहे. प्रियांकाने नकार दिल्याने आयटम नंबरसाठी कॅटरिनाकडे विचारणा करण्यात आली. तिला हा प्रस्ताव आवडला असून ती यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे सनी लिओनीकडून देखील होकार मिळण्याची शक्यता आहे. कॅटरिनाने याआधी आयटम नंबर केले असून तिचे आयटम नंबर्स हीट ठरले आहेत.