Join us

सलमान खानसाठी कॅटरिना कैफने मॅनेजर रेशमा शेट्टीला दाखविला घरचा रस्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 16:50 IST

बॉलिवूडमध्ये सलमानसह कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या सुपरस्टार्सच्या मॅनेजमेंट कंपनीची जबाबदारी सांभाळणारी मॅनेजर रेशमा शेट्टी ...

बॉलिवूडमध्ये सलमानसह कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या सुपरस्टार्सच्या मॅनेजमेंट कंपनीची जबाबदारी सांभाळणारी मॅनेजर रेशमा शेट्टी हिला कॅटरिनाने केवळ सलमान खानमुळे घराचा रस्ता दाखविला आहे. सध्या सलमान आणि कॅटरिनामध्ये पुन्हा एकदा प्रेमसंबंध बहरताना दिसत आहेत. अशात सलमानची मर्जी सांभाळण्याची एकही संधी सोडण्यास कॅटरिना तयार नसल्यानेच तिने रेशमाची हकालपट्टी केली आहे. आता तुम्ही म्हणाल की, सलमान आणि कॅटरिनामध्ये रेशमा शेट्टीचे काय कनेक्शन? याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. तब्बल नऊ वर्षांपासून सलमानच्या मॅनेजमेंटचे काम सांभाळणाºया रेशमा शेट्टी अन् सलमानमध्ये मध्यंतरी चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर सलमानने रेशमाला त्याच्या कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखविला होता. त्यावेळी दोघांच्या नात्यात खूपच ताणाताणी झाल्याच्या चर्चाही पसरल्या होते. रेशमाला काढल्यामुळे सलमानच्या मॅनेजमेंट कंपनीची संपूर्ण जबाबदारी त्याचा लहान भाऊ सोहेल खान याच्यावर सोपविली होती. सोहेलने एक मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली असून, त्याची संपूर्ण जबाबदारी आता तोच सांभाळणार आहे. आता आलेल्या माहितीनुसार कॅटरिनानेही रेशमाला बाहेरचा रस्ता दाखविला असून, तिच्या मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी तिने सोहेलच्या कंपनीवर सोपविली आहे. रेशमा आणि कॅटरिना गेल्या सहा-सात वर्षांपासून एकत्र काम करीत आहेत. एका मीडिया हाउसच्या रिपोर्टनुसार, ‘कॅटरिनाने अगोदरच रेशमाकडून मॅनेजमेंट जबाबदारी काढून घेतली असून, सलमान-सोहेल खान कंपनीसोबत पुढचा प्लॅन केला आहे. सूत्रानुसार, कॅटरिनाने रेशमाला कंपनी सोडण्यास अगोदरच सांगितले असून, सलमानच्या कंपनीसोबत काम करण्यास तिने सुरुवातही केली आहे. कॅटरिना सध्या सलमानसोबत आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सोहेलच्या कंपनीबरोबरच तिला पुढचे मॅनेजमेंट करावे लागणार आहे. बॉलिवूडमधीलच एका सूत्राने सांगितले की, रेशमासोबत काम करणारी संध्या हिनेही रेशमासोबतचे सर्व प्रोफेशनल नाते तोडले आहेत. सध्या ती सोहेलच्या कंपनीत सहभागी झाली असून, तिच कॅटरिनाच्या मॅनेजमेंटचे काम बघणार आहे. आता कॅटरिनासोबत आणखी कोणकोणते स्टार सोहेलच्या कंपनीशी जोडले जातील, हे बघणे मजेशीर ठरणार आहे. खरं तर भाईजान सलमानसोबत आतापर्यंत ज्याने पंगा घेतला त्याला बॉलिवूडमधून काढता पाय घ्यावा लागला. आता रेशमा सलमान-सोहेलच्या कंपनीपुढे किती दिवस टिकून राहील हे बघणे मजेशीर ठरणार आहे.