कॅटरिना कैफचे ब्राईडल फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST
सध्या सोशल मीडियावर कॅटरिना कैफचा ब्राईडल लूक ट्रेंड करतोय. लाईट मेकअप आणि त्याला साजेशी ज्वेलरी यात कॅट एखाद्या राजकुमारीसारखी सुंदर दिसतेय.
कॅटरिना कैफचे ब्राईडल फोटोशूट
सध्या सोशल मीडियावर कॅटरिना कैफचा ब्राईडल लूक ट्रेंड करतोय. लाईट मेकअप आणि त्याला साजेशी ज्वेलरी यात कॅट एखाद्या राजकुमारीसारखी सुंदर दिसतेय.डार्क पिंक कलरच्या या गाऊनमधील कॅटरिनाचा लूक पाहाच. तुम्ही तिच्यावरून नजर हटवू शकणार नाही. नुकतीच ‘टायगर जिंदा है’च्या शूटींगवरून परतलेली कॅटरिनाचा हा मॉर्डन ब्राईड लूक एका मॅगझिनसाठी आहे. या मॅगझिनसाठी कॅटने नुकतेच एक फोटोशूट केले. पांढ-या गाऊनसोबत नाकात नथ हे कॉम्बिनेशन आकर्षक आहे. लूक वेस्टर्न असो वा ट्रॅडिशनल दोन्ही लूकमध्ये कॅट अप्रतिम दिसते. या इंडो वेस्टर्न लूकमध्येही ती तितकीच सुंदर दिसतेय. पांढ-या व ग्रीन शोल्डर गाऊनमध्ये जेम स्टोन ज्वेलरीतही तिचे सौंदर्य खुलून आले आहे.