Join us

केट विन्सलेटचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:40 IST

प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार पटकावणारी हॉलिवूडची गुणी अभिनेत्री केट विन्सलेट हिने अलीकडेच आपल्या आयुष्यातील एक गुपित उघड केलेय. शालेय जीवनात ...

प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार पटकावणारी हॉलिवूडची गुणी अभिनेत्री केट विन्सलेट हिने अलीकडेच आपल्या आयुष्यातील एक गुपित उघड केलेय. शालेय जीवनात ती आपल्या लूकबाबत कायम चिंताग्रस्त असायची. ४0 वर्षीय केट 'सीबीएस गुड मॉर्निंगला'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणते, 'बालपणी मी बुटकी आणि लठ्ठ होते. यामुळे शाळेत मी सर्वांच्या चेष्टेचा विषय ठरायची. सर्व जण मला चिडवायचे. यामुळे मी तणावात असायची. आता आम्हाला कार्पेटवर वॉक करताना बघून अनेक मुलींना आमच्याप्रमाणे व्हावेसे वाटते. मात्र, मला अशा मुलींना आवर्जुन सांगावेसे वाटते, की आम्ही कायम अशा नव्हतो. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या मुलींनी अशा टप्प्यातून पुढे जाण्याचीही तयारी ठेवायला हवी.' मुलांना शाळेत सोडायला जाताना आपण अनेकदा गाऊन घालून गेल्याचे केटने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.