कार्तिक देणार बहिणीला सरप्राईज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 20:02 IST
रक्षाबंधनाचा सण हा बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या नि:स्वार्थ प्रेमाचे प्रतिक असणारा हा सण ...
कार्तिक देणार बहिणीला सरप्राईज!
रक्षाबंधनाचा सण हा बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणीच्या नि:स्वार्थ प्रेमाचे प्रतिक असणारा हा सण उत्साहात साजरा करतात. अभिनेता कार्तिक आर्यन हाही त्यापैकीच एक़ उद्या (१८ आॅगस्ट) रक्षाबंधनाच्या दिवशी आर्यन आपल्या बहिणीला एक सरप्राईज देणार आहे. होय, आर्यन हा ग्वाल्हेरचा आहे . उद्या राखीच्या दिवशी खास बहिणीला भेटण्यासाठी आर्यन ग्वाल्हेरला रवाना झाला आहे. पुढचे दोन दिवस बहिणीसोबत एन्जॉय करण्याचा त्याचा प्लॅन आहे. विशेष म्हणजे बहिणीची आवड लक्षात घेऊन त्याने तिच्यासाठी एक खास कस्टमाईज घड्याळही बनवून घेतले आहे. ही भेट म्हणजेच आर्यनचे सरप्राईज आहे. सो क्यूट ना!!